मुंबई

हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार

CD

उल्हासनगर, ता.२ (वार्ताहर) : भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार द्वारली गावातील एका भूखंडावरील वादामुळे महेश गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांचे मुलगा वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की केली होती. याची तक्रार देण्यासाठी आमदार गणपत गायकवाड हे हिललाईन पोलिस ठाण्यात आले होते. त्यावेळी गणपती गायकवाड यांच्या मागे महेश गायकवाड यांची सहकारी पोहचली. हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर दोन्ही गट बसलेले असताना हा गोळीबार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गोळीबारात कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना तीन गोळ्या लागल्या आहेत, तर बैलगाडा फेम राहुल पाटील यांना एक गोळी लागली आहे. गोळीबारानंतरचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या दोन्ही जखमींना उल्हासनगरच्या मिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर महेश गायकवाड यांना पुढील उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महेश गायकवाड यांच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. यात गणपत गायकवाड यांना पोलिसांनी बसून ठेवले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर भाजप आणि शिंदे गटाचे पदाधिकारी पोलिस ठाण्याच्या आवारात एकवटले असून हिललाईन ठाण्याला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT