crime for cutting tress mumbai  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: बांधकामासाठी वृक्षतोड केली म्हणून चौघांवर गुन्हा दाखल!

Navi Mumbai Crime: Four booked for cutting trees for construction!

CD

Navi Mumbai Crime: गोठवली गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने इमारतीच्या बांधकामासाठी १५ ते २० वर्षे जुन्या असलेल्या आठ वृक्षांची बेकायदा कत्तल करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने या वृक्षतोडीची गंभीर दखल घेऊन जमीन मालकासह जमिनीवर बांधकाम करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोठवली गावातील रत्नदीप पार्केलगत असलेल्या १५ ते २० वर्षे जुन्या नारळाची पाच, आंब्याची दोन, जांभळाच्या एका झाडाची बेकायदा कत्तल केल्याची तक्रार ऑगस्ट २०२३ पालिकेच्या उद्यान विभागाकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी संजय तायडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता झाडे तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी गोठवली गावातील रतन म्हात्रे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, म्हात्रे यांनी महापालिका कार्यालयात कोणताही खुलासा दिलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी पालिकेने चौघांविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गोठवली गावात बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी चौघांविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांनी वृक्षतोड करून त्याठिकाणी सुरू केलेल्या इमारतीच्या बांधकामालासुद्धा नोटीस बजावली आहे.
- संजय तायडे, सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT