मुंबई

Navi Mumbai News: नेरूळ रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा वेढा ;प्रवासी त्रस्त

CD

ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरूळ रेल्वे स्थानकात पश्चिमेकडून प्रवेश करणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला फेरीवाले, फूलविक्रेते आणि इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून बस्तान मांडले आहे. त्‍यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

नेरूळ रेल्वे स्थानक हे ट्रान्स व हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. पश्चिमेकडील नेरूळ गाव, सारसोळे, कुकशेत गाव परिसरातील प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. नेरूळ रेल्वे स्थानकाची निर्मिती सिडकोने केली आहे. स्टेशन कॉम्प्‍लेक्‍सचा वाणिज्य वापर व्हावा या हेतूने पूर्व व पश्चिमेला गाळे बांधण्यात आले आहेत.

यातील गाळेधारकांनी समोरील मोकळी जागादेखील गिळंकृत केली आहे. त्यातच नेरूळ स्थानकातील पश्चिमेकडील प्रवेश मार्गात हॉटेल द्वारकाजवळील मार्गावर सकाळ आणि विशेषत: संध्याकाळी उशिरापर्यंत हार, भाजी, फळे आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेते यांनी बस्‍तान मांडल्याने त्यातून वाट काढताना प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

पश्चिमेकडील कॉम्प्‍लेक्‍समध्ये एक वाईन शॉप असून काही जण मद्य घेऊन प्रवाशांच्या मार्गात सर्रास दारू पिताना दिसून येत आहेत. त्‍याचा विशेषत: महिला वर्गाला त्रास सोसावा लागत आहे. नेरूळ रेल्वे स्थानकातील सुरक्षेची जबाबदारी ही सिडकोची आहे; मात्र या फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT