Garlic sakal
मुंबई

Mumbai News: आवक कमी झाल्याने मुंबईत लसणाच्या दरात तेजी; मोजावे लागत आहेत 'इतके' पैसे

, garlic is in the range of Rs 400 in the retail market.

CD

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने बाजारात कमी प्रमाणात लसूण येत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात सतत वाढ होत असून महिनाभरापूर्वी १२० ते २०० रुपये किलो असणारा लसूण आता घाऊक बाजारात २३० ते ३७० रुपये किलो आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसूण ४०० रुपयांच्या घरात आहे.

आठ महिन्यांपासून लसणाच्या दरात वाढ सुरू झाली आहे. ८० ते १०० रुपये किलो असणारा लसणाचा दर १०० रुपये किलोपासून वाढत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातून लसणाला पर्याय आहे. महिन्याभरापूर्वी लसणाच्या दरात वाढ झाली होती. तेव्हा चांगला लसूण २०० रुपये किलोपर्यंत गेला होता.

मात्र आता या आठवड्यात लसणाच्या दराने आणखी उसळी घेतली असून चांगला लसूण घाऊक बाजारातच ३७० रुपये किलोपर्यंत आणि किरकोळ बाजारात ४०० रुपयांवर गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या दोन वर्षांत लसणाचे दर तुलनेने कमी होते. घाऊक बाजारात लसूण ५० ते ८० रुपये किलोपर्यंत होता. उत्पादन खर्चही निघत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी लसणाचे उत्पादन घेणेच थांबवले होते. त्यामुळे बाजारात लसणाची कमतरता जाणवायला लागली आहे.

नवीन आवकपर्यंत हीच स्थिती
एपीएमसी घाऊक बाजारात लसणाच्या दैनंदिन सहा ते सात गाड्यांची आवक होत होती. मात्र, आता केवळ एक किंवा दोन गाड्यांची आवक होत आहे. त्यातच मार्केटमधील व्यापाऱ्यांकडे असणारा लसूण संपलेला असल्यामुळे दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात लसणाचे दर चढेच राहणार असून नवीन आवक सुरू झाल्यानंतर दर आटोक्यात येण्यास सुरुवात होईल.

घाऊक बाजारात लसणाची मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश येथून आवक होत असते. यंदा या भागातच उत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे आवक घटल्याने बाजारात लसणाच्या दरात तेजी राहणार आहे.
- अशोक वाळुंज, व्यापारी, एपीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT