theft crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: वाशीत भरदिवसा दोन घरफोड्या; लाखोंचे दागिने गेले चोरीला

A case has been registered in Vashi police station regarding both the incidents| दोन्ही घटनांप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime: वाशीमध्ये भरदिवसा दोन बंद घरांमध्ये घरफोडी करून चार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यात आले आहेत. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.


वाशी सेक्टर-१६ मध्ये राहणारे संजय रामकृष्णन (४७) हे व्यावसायिक उलवेतील भावाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी रामकृष्णन यांच्या घरातील पावणेचार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. रामकृष्णन यांच्या घराचे दरवाजे उघडे असल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता.

त्यामुळे त्यांनी रामकृष्णन यांना संपर्क साधला होता. यावेळी चोरट्यांनी रामकृष्णन यांच्या शेजारील बिल्डिंगमध्ये राहणारे त्यांचे मित्र सचिन निमगरे यांच्या घराचे लॉक उचकटून सोन्याचे दागिने, कॅमेरा असा ३० हजारांचा ऐवज चोरला आहे. त्यामुळे दोन्ही घटनांप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

CJP आंदोलनाचा व्यापाऱ्यांना फटका, २ हजार कोटींचं नुकसान; व्यवसाय ठप्प, CTIने केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT