मुंबई

वाणगावमध्ये रंगला विद्यार्थ्यांचा फॅशन शो

CD

वाणगाव (बातमीदार) : वाय. एन. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, स्वाती पाटील बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन, कृषी तंत्र निकेतन, मनुभाई मेहता बी. एस. सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि तात्यासाहेब कोरे लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अस्तित्व वार्षिक सांस्कृतिक महोत्सव, तसेच फॅशन आयोजित करण्यात आला होता. डिझाईन महाविद्यालयाच्या वतीने कला प्रदर्शन, फॅशन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीचा आनंद उपस्थितांना घेता आला. प्रा. इमाम अली यांनी डिझाईन केलेल्या कपड्यांचा शो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी डिझाईन केलेले कपडे परिधान करून रॅम्प वॉक झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग निरीक्षक राहुल पवार व बांधकाम व्यावसायिक नामदेव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राहुल पवार व नामदेव चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कला प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी डिझाईन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी तयार केलेले कपडे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील हजारो फॅशन प्रेमींनी व नागरिकांनी भेटी देऊन खरेदी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT