मुंबई

Dombivli Traffic: डोंबिवलीमध्ये वाढला कर्णकर्कश सायलेन्सरचा दणदणाट, कोण कारवाई करणार ? नागरिकांचा सवाल

मोठ्याने आवाज करणाऱ्या सायलेन्सर असलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : सायलेन्सरमध्ये अनावश्यक बदल करून कर्कश्‍श आवाज निर्माण करत फेरफटका मारण्याची हट के क्रेझ वाढत आहे. बुलेट किंवा दुचाकीला लावण्यात येणाऱ्या कर्णकर्कश सायलेन्सरवर वाहतूक विभागाकडून कारवाई होत असते; मात्र तरीही अनेक दुचाकीस्वार बुलेट बाईकला कर्णकर्कश सायलेन्सर बसवतात. ठाकुर्ली ९० फिट रोडवर अशा आवाज करणाऱ्या दुचाकी भरधाव वेगाने नेणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण वाढले आहे. याचा नागरिकांना त्रास होत असून त्यांच्यावर कोणी कारवाई करेल का, असे ट्विट सामान्य नागरिक ठाणे वाहतूक विभागाला करत सवाल करत आहेत.

शहरात दुचाकीस्वारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच वाहतूककोंडीत कर्णकर्कश्श हॉर्न वाजवण्याचे प्रकार दुचाकीस्वारांकडून सुरू असतात. त्यात बुलेट किंवा बाईकला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावलेले असतात. रुग्णालये, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी अशा सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण होते. कल्याण-डोंबिवली परिसरात प्रशस्त रस्त्यांवरून बुलेटचालक कर्णकर्कश्श हॉर्न वाजवत वाहन चालवत आहेत.

कल्याण-शीळ रोड, मानपाडा रोड, ९० फिट रोड, रेल्वे समांतर रस्ता, नेहरू मैदान परिसर, सावरकर रोड यांसह शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अशा अनेक ठिकाणी दुचाकीस्वार हे सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखा आवाज करून एक प्रकारे ध्वनिप्रदूषण करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. कोळसेवाडी वाहतूक विभाग, डोंबिवली वाहतूक विभागाकडून गेल्या वर्षभरात साधारण २०६ दुचाकी वाहनधारकांवर कारवाई केली आहे; मात्र अशा प्रकारच्या कारवाईचा धाक वाहनचालकांना उरलेला नाही. त्यामुळे असे सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजचालकांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

दुचाकीस्वारांना दंड
मोठ्याने आवाज करणाऱ्या सायलेन्सर असलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. एक हजाराच्या आसपास ही दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच अशा दुचाकींचे सायलेन्सरही काढून घेतले जातात. दोन वर्षांपूर्वी कल्याण आणि डोंबिवली वाहतूक विभागाने मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर्कश्श आवाज करत फिरणाऱ्या बुलेटधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. सुमारे ३०० हून अधिक अशा पद्धतीचे सायलेन्सर काढून पोलिसांनी त्यावर रोडरोलर फिरवून ते नष्ट करून टाकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Case: सुप्रीम कोर्टानेही मानलं शिवसेना ठाकरेंची? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादातून नेमकं काय समोर आलं? ते 11 मुद्दे काय?

Real Estate Revenue: बांधकाम क्षेत्राला अच्छे दिन! चार महिन्यांत मुद्रांक विभागाचा महसूल २१,९२८ कोटींवर; १७ टक्क्यांनी वाढ

Koyna Dam Water Level : कोयना धरणातील पाणीसाठा चार दिवसांपासून 92 टीएमसीवर स्थिर; महाबळेश्वर, नवजा, कोयनानगरमध्ये किती पाऊस?

Marathi News Live Updates : पुण्यासह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, कोकणासाठी आज यलो अलर्ट जारी

Tukaram Mundhe: अ‍ॅनालॉग पनीर बंदीवर तुकाराम मुंढेंचे स्पष्टीकरण, सावजीबाबत माफीचा प्रश्नच नाही

SCROLL FOR NEXT