Social Media Sakal
मुंबई

सोशल मीडियामुळे पत्रिका छपाईच्या व्यवसायावर परिणाम झालाय का?

Printing Business: तुळशी विवाहानंतर लग्नसराईची धामधूम सुरू होते. छपाई कारखान्यांचा विस्तार होत गेला, तसा काही दशकांपूर्वी छपाई पत्रिका देण्याची पद्धत रूढ झाली होती

सकाळ वृत्तसेवा

Impact of Social Media on Printing Business

जव्हार : सोशल मीडियामुळे नागरिकांच्या प्रत्यक्ष जीवनात बदल होत आहेत. एखाद्या धार्मिक, सामाजिक कार्यासाठी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना आमंत्रण देण्यासाठी पत्रिका देण्याचा ट्रेंड गेली काही दशके सुरू होता. मात्र आता सोशल मीडियामुळे छपाई करून नातेवाईकांना पत्रिका देण्याऐवजी ऑनलाईन समाज माध्यमांवरून बोलावण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी आमंत्रण पत्रिकांची छपाई होत नसल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे.

तुळशी विवाहानंतर लग्नसराईची धामधूम सुरू होते. छपाई कारखान्यांचा विस्तार होत गेला, तसा काही दशकांपूर्वी छपाई पत्रिका देण्याची पद्धत रूढ झाली होती. त्यामुळे लग्नपत्रिका छापून त्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना कार्यक्रमापूर्वी वेळेत देण्यासाठी कसरत सुरू होते. यासाठी वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र सध्याच्या डिजिटल युगात लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्षात देण्याऐवजी ई-वेडिंग कार्ड आणि व्हिडीओचा वापर करण्याचा ट्रेंड वाढत आहे. परिणामी ऑफसेट अथवा छपाई कारखान्यांत पारंपरिक पद्धतीने लग्नपत्रिका छापण्याचे प्रकार कमी होत आहेत.

ग्रामीण भागात एखादा कार्यक्रम असल्यास वसई, विरार, मुंबई, ठाणे अथवा नाशिक या ठिकाणी जाऊन छपाई करण्यात येत असे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील शहराच्या ठिकाणी छपाई कारखाने सुरू झाल्याने नागरिकांनी घरापासून जवळ असलेल्या ठिकाणी आमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी प्राधान्य दिले. मात्र आता सोशल मीडियामुळे कमी वेळेत, खर्चात आमंत्रण देण्याच्या ऑनलाईन पत्रिकेला पसंती असल्याने अनेकांचे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

तरुणांकडून नवीन ट्रेंड
प्रत्यक्ष पत्रिका आली तरच लग्नाला जायचे, अशी मानसिकता अजूनही बहुतांश नागरिकांची आहे. मात्र बदलत्या काळानुसार लग्न पत्रिकांचा ट्रेंडही बदलण्याची गरज असल्याचे तरुणाईचे मत आहे. नागरिकांनीही आपल्या मानसिकतेत बदल करणे अपेक्षित असल्याचा सूर तरुणांमधून आता उमटत आहे.

निवडणूक काळात मोठी मागणी
निवडणूक म्हटले की, मतपत्रिकेचा नमुना, जाहीरनामा, उमेदवारांची चिन्हे प्रचारासाठी विविध प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणात छापले जात होते. त्याचबरोबर पूर्वी व्यावसायिक व दुकानदारांसाठी लागणारी पावती पुस्तके, बिल बुक, खाते बुक, लेटर पॅड, व्हिजिटिंग कार्ड, शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरणाच्या पत्रिका आदी साहित्य छपाईवाल्यांकडून घेतले जात होते; परंतु सध्या यामध्ये कमालीची घट झाली आहे.

कर्ज फेडण्याचे आव्हान
बहुतांश व्यापारी व विक्रेते हे संगणकावर स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून दैनंदिन व्यवहारातील खरेदी-विक्रीची बिले सुद्धा संगणक, स्मार्टफोनवर मिळत असल्याने प्रिंटिंग व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत आला आहे. लाखो रुपयांच्या मशिनरी खरेदी केल्याने बँक व पतसंस्थेचे हप्ते वेळेवर देणे अवघड झाले आहे.

डिजिटल बोर्ड छपाईला प्राधान्य
छपाई व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एकीकडे लग्नपत्रिका छपाईत घट झाली असली, तरी डिजिटल बोर्ड छपाईचे प्रमाण वाढत आहे. नेतेमंडळी किंवा कार्यकर्त्यांचे वाढदिवस, दौरा, वाढदिवस, विकासकामाचे उद्‍घाटन, भूमिपूजन अशा आशयाचे डिजिटल बोर्ड छापण्याची नवीन परंपरा सोशल मीडियाच्या युगात निर्माण झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ऑनलाईन निमंत्रण लोकांना मान्य असल्याने वेळ व पैसा दोन्ही वाचत आहे. लग्नपत्रिका आता मोबाईल, सोशल मीडियाद्वारे पाठवल्या जातात व त्यामुळे प्रिंटिंग व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे.
- शैलेश आर्ट्स, ऑफसेट प्रिंटर्स, व्यावसायिक

ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियामुळे प्रिंटिंग हा व्यवसाय
मर्यादित झाला आहे. सध्या फक्त लग्न पत्रिकेची डिझाईन तयार करून घेण्याचा प्रकार वाढला. त्यामुळे छपाईवर परिणाम झाला आहे.
- संदीप रावते, ऑफसेट प्रिंटर्स, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT