thane local 
मुंबई

Mumbai Local Accident: मंगळवार ठरला ठाणेकरांसाठी घात वार, एकाच दिवशी तीन जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू

Thane: पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

CD

ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) : मंगळवार हा रेल्वे प्रवाशांकरिता घात वार ठरला. मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान एकाच दिवशी तीन जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. प्रभाकरन पुजारी, रवी पांडे आणि जयेश पाटील अशी मृतांची नावे आहेत.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मुलुंड येथील विजयानगर मुरुगन गल्ली येथे राहणारे प्रभाकरन राजेंद्रन पुजारी (वय २६) आणि उल्हासनगर येथे राहणारा रवी पांडे (वय २०) हे दोघे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून ठाणे ते मुलुंड स्थानकांदरम्यान असलेल्या कोपरी पुलाखाली पडले.

दुसरीकडे डोंबिवलीत राहणारा जयेश रामचंद्र पाटील (वय २७) हा याच परिसरात लोकलमधून पडून जखमी झाला. याबाबतची माहिती स्टेशन मास्तरना मिळताच त्यांनी रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. या वेळी पोलिसांनी तिघांनाही ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता पांडे आणि पुजारी नामक प्रवाशांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता; तर पाटील याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याबाबत पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Woman Police Case : रक्षकच बनले भक्षक! महिला पोलिस कॉन्स्टेबलवर 8 वर्षे सामूहिक बलात्कार; पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर सुरु होणार लाईट अँड साऊंड शो

महाराष्ट्रात MOFA आणि RERA चे वेगळे नियम; सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा, नवे नियम काय?

Chhatrapati Sambhajinagar Election : महापालिकेचे चौथे इलेक्शनही पाण्यावर! महापालिकेवर वाढले कर्ज; नागरिकांवर वाढीव पाणीपट्टीचे संकट

SCROLL FOR NEXT