मुंबई

‘ट्रीग्योविना’त के. सी., तोलानी महाविद्यालयाची चमक

CD

मुंबई, ता. १४ : विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला ‘ट्रीग्योविना’ हा आंतरमहाविद्यालयीन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत आयोजित स्पर्धांमध्ये २०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. यात के. सी. महाविद्यालय आणि तोलानी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावली.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्‍घाटन ‘आयआरएस’ पियूष कमल यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्यांसाठी इतरांना दोष देऊ नये. दीर्घकाळ यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्या, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रतिभा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ट्रीग्योविना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरमहाविद्यालयीन कार्यक्रमात टर्फ फुटबॉल, गायन, नृत्य व रस्सीखेच आदी स्पर्धा पार पडल्या. टर्फ क्रिकेट स्पर्धेत खालसा महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, रस्सीखेच स्पर्धेत वर्तक महाविद्यालयाने बाजी मारली.

स्पर्धांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील ३० ते ३५ नावाजलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. के. सी. व तोलानी महाविद्यालयाने भरघोस पारितोषके जिंकण्याची कामगिरी केली. सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून के. सी. महाविद्यालयाला गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता पवार आणि साठ्ये महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रमोदिनी सावंत यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT