Crime News esakal
मुंबई

Navi Mumbai News: दोन बांगलादेशींना खिडुकपाड्यातून अटक

Navi Mumbai News: भारतात घुसखोरी केल्याचे चौकशीतून उघडकीस आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai News: तळोजा येथील खिडूकपाडा भागात बेकायदा वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने अटक केली आहे. बेलाल सलाउद्दीन मोल्ला (३३) व रसूल जलील शेख (३३) अशी या दोघांची नावे असून २५ वर्षांपूर्वी त्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे चौकशीतून उघडकीस आले आहे.

तळोजा येथील खिडूकपाडा येथे दोन बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. ९) दहशतवाद विरोधी पथकातील पथकाने तळोजा नावडे येथील खिडूकपाडा येथील नाना ठाकूर यांच्या मालकीच्या घरावर छापा मारला. यावेळी घरामध्ये बेलाल सलाउद्दीन मोल्ला व रसूल जलील शेख हे दोघे आढळून आले.

त्यांनी आई-वडिलांसह घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने दोघांविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT