crime news jail  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: अमली पदार्थासह नायजेरियनला अटक!

रात्री सव्वा दहाच्या सुमारास अब्दुल रझाक हसन (३४) हा नायजेरियन नागरीक संशयास्पदरित्या आल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

खारघर सेक्टर-३५ मध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अब्दुल रझाक हसन (३४) असे या नागरीकाचे नाव असून त्याच्याजवळ ५ लाख ५० हजारांचे एमडी सापडले आहे.

खारघर सेक्टर-३५ मधील सावन रेसिडेन्सी समोरील रोडवर एक नायजेरियन अमली पदार्थांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने शुक्रवारी (ता.१६) रात्री खारघर सेक्टर-३५ भागात सापळा लावला होता. यावेळी रात्री सव्वा दहाच्या सुमारास अब्दुल रझाक हसन (३४) हा नायजेरियन नागरीक संशयास्पदरित्या आल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ प्लास्टिक पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे एमडी (मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ आढळुन आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अब्दुल रझाक हसन याच्या जवळ सापडलेले पदार्थ जप्त केले. तसेच त्याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT