मुंबई

Railway News: आता कोकण मार्गावर अनारक्षित मेमू!

या मेमू ८ डब्यांच्या असणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

kokan News| कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेकडून चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी दरम्यान अनारक्षित मेमू सोमवार पासून चालविण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११६० चिपळून-पनवेल अनारक्षित मेमू सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे. या ट्रेनला अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखावती, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे स्थानकात थांबा दिला आहे.

ट्रेन क्रमांक ०११५९ पनवेल - रत्नागिरी अनारक्षित मेमू सोमवार,१९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सुटून मंगळवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचणार आहे.या ट्रेनला सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजाणी येथे थांबेल. , चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकात थांबा दिला आहे.या मेमू ८ डब्यांच्या असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT