मुंबई

मनमोहक, लालभडक पळस फुलला

CD

जव्हार, ता. २० (बातमीदार) : गुलाबी थंडी ओसरून सर्वत्र उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आहे. वातावरणात सतत बदल होत आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी थंडी अशा निसर्गाच्या खेळातून आता जव्हार परिसरातील रस्ते असो किंवा जंगलव्याप्त भागात ठिकठिकाणी पळसाची फुले आपल्या नैसर्गिक सौंदर्याने रंग उधळताना दिसत आहेत. पळस म्हणजे फलाश वृक्ष. इंग्रजीत त्याला ‘फेल्म ऑफ फॉरेस्ट’ असे म्हटले जाते. सर्वत्र फुललेल्या पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
जव्हार तालुक्यातील मुंबई, नाशिक, सेल्वासा, डहाणू रोडसह जंगलातील काही भागात रस्त्याच्या कडेला पळसाची मोठमोठी झाडे सध्या लालेलाल रंगांनी भरलेली आहेत. उन्हाळा सुरू झाला की, झाडांना पानगळ होऊ लागते आणि निष्पर्ण पानांची पडझड जंगलात सर्वत्र पाहायला मिळते. अशा वेळी मात्र काही झाडे बहरत असतात. यातील बहरणारे एक झाड म्हणजे पिवळा, लाल भडक पळस. हा वृक्ष वर्षभर हिरवागार असतो; पण वसंत ऋतू आला की, याची पानगळ होऊन एकही पान झाडाच्या फांदीवर शिल्लक राहत नाही; परंतु फुलांचे गुच्छ लाल भडक रंगाने फुललेले सर्वत्र जाणवते. जणू काही येणाऱ्या रंगपंचमीच्या रंगांची पिचकारी घेऊन हा निसर्ग आला की काय, असे वाटू लागते. संपूर्ण झाड वणव्यासारखे पेटल्यासारखे दिसते. त्यामुळे परिसराचे सौंदर्य फुलत आहे.

--------------
औषधी गुणधर्म
प्राचीन काळापासून शास्त्रामध्ये पळसाचा औषधी उपयोग होतो. उष्ण व जास्त तिखट पदार्थ खाण्यामुळे मूत्रविसर्जनावेळी आग होते. पूर्ण साफ होत नाही. अशावेळी पळसाची फुले वाळवून त्याचे चूर्ण करून दूध व खडीसाखरेसह खाल्ले जाते. सूज, गळू यावर पळसाची पाने बांधली जातात. उष्णता, रक्तस्राव यासाठी पळसाची फुले उत्तम काम करतात.

----------
पर्यावरणपूरक पत्रावळ्या
पळस ही आयुर्वेदिक वनस्पती असून जेवणाच्या पत्रावळीसाठीसुद्धा पळसाच्या पानाचा उपयोग होतो. आदिवासी लोकांना यामुळे मोठा रोजगार मिळतो. पळसाला गर्द केशरी रंगाची फुले येतात. काही ठिकाणी पिवळी रंगाची फुलेसुद्धा येतात. डिसेंबर-जानेवारीत फुले येण्यास सुरुवात होते. पोळा सणाच्या वेळी पळसाच्या डहाळ्या चौकटीवर बांधल्या जातात. म्हणून पळसाचे मोठे महत्त्व आहे.

------------
जपानमध्ये पळसाचा ‘चेरी उत्सव’
ज्याप्रमाणे आपण फुलांचा उत्सव साजरा करतो, त्याच प्रकारे जपानमध्ये पळस फुलांचा फार मोठा उत्सव साजरा करतात. त्याला चेरी उत्सव म्हणातात. त्या देशामध्ये पळस फुलांवर अनेक कविता रचण्यात आल्या. पळसांची झाडे म्हणजे जणू तथागत बुद्धांच्या दर्शनार्थ उभे असलेल्या भिक्षू संघाची रांगच वाटू लागते, असे वर्णन निसर्ग कवी मारुती तमनपल्ली यांनी आपल्या ‘जंगलाचे देणे’ या पुस्तकात केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: हातावर शिवरायांचं चित्र गोंदलं म्हणून हात तोडून चौकात लटकवणार; वाल्मिक कराडची महिलेमार्फत धमकी

JOSAA Counseling Result 2025: जोसा काउंसिलिंग फेरी 3 चा निकाल जाहीर, चेक करा थेट एका क्लिकवर

VIRAL VIDEO: राम कृष्ण हरी! हिरवी नववार, मराठमोळा श्रृगांर, डोईवर तुळस, रिंकू राजगुरूचा वारीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Satara News : ओंकार साळुंखे ‘बालगंधर्व’ने सन्मानित; महाराष्ट्रातील प्रसिद्ध ड्रम पॅड वादक म्हणून नाव कमावले

SCROLL FOR NEXT