मुंबई

Mumbai News: अटल सेतू नंतर आता होणार या सागरी सेतूचं लवकरच होणार उद्घाटन; पायलिंगचे काम झाले सुरू

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू: मुंबईच्या वाहतुक बदलाची सुरुवात | मध्यभागी सर्वात लांब सुमारे ३०० मीटर लांबीचा लोखंडी स्पॅन असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Upcoming Bridge: वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडून पुढे तब्बल १७ किलोमीटर लांबीचा वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

प्रकल्प आराखड्यानुसार समुद्रात पायलिंग आणि पाया उभारण्याचे काम सुरू झाले असून लवकरच सागरी सेतू आकार घेताना दिसू लागणार आहे

पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी फोडण्याबरोबरच येथील वाहतुकीला वेग देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुमारे ११ हजार ३३३ कोटी रुपये खर्चून आठ मार्गिका असलेला सागरी सेतू उभारला जाणार आहे. या पुलाच्या दोन्ही मार्गिकांची रुंदी सुमारे २८ मीटर आहे. मध्यभागी सर्वात लांब सुमारे ३०० मीटर लांबीचा लोखंडी स्पॅन असणार आहे.

याचे काम ॲप्को इन्फ्रास्ट्रक्चरकडून केले जात आहे. सध्या पुलाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पायलिंग आणि फाउंडेशन उभारण्याचे काम सुरू आहे. पाच टप्प्यांत या पुलाचे काम होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पायलिंग आणि फाउंडेशन उभारण्याचे काम झाल्यानंतर अरसीसीचे खांब बनवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतू उभारण्यासाठी आवश्यक असलेले पायलिंग आणि पायाचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर लवकरच पुढील काम हाती घेतले जाणार आहे. त्यानंतरच पुलाचे बांधकाम दिसू लागेल.


- सुनील बुथडा, मुख्य अभियंता, एमएसआरडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT