Navi Mumbai mahapalika  esakal
मुंबई

Navi Mumbai: आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; मनपाने घेतला पाच उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय

१ सेक्टर २१ आणि २८ ला जोडण्यासाठीही उड्डाणपुलाचे नियोजन महापालिकेतर्फे केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुजित गायकवाड,


Navi Mumbai News: शहरातील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरवासीयांना नवे उड्डाणपुलाची भेट मिळणार आहे. नवी मुंबईतून ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडीकडे जलद गतीने जाण्यासाठी ऐरोली-घणसोली उड्डाणपूल होणार आहे.

पामबीच मार्गाहून थेट सायन-पनवेल महामार्गावर जाण्याकरिता वाशी सेक्टर १७ येथे २९० मीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासोबत महापे उड्डाणपुलाहून ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी एक आर्म तयार केला जाणार आहे.

दिवाळे गावातून सायन-पनवेल महामार्गावर आणि नेरूळ फेज १ सेक्टर २१ आणि २८ ला जोडण्यासाठीही उड्डाणपुलाचे नियोजन महापालिकेतर्फे केले जात आहे. त्‍यामुळे २०२४ वर्षाअखेरीस नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्‍यता आहे. (navi Mumbai MNP news )

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षात विमानतळाच्या एका टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण होईल. विमानतळाला पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. शहरातील वाहनांचा वाढता ताण लक्षात घेता, महापालिकेने काही उड्डाणपुलांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित केले आहेत.(navi mumbai traffic problem resovled)

सध्या दोन ठिकाणी उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. १५ वर्षे प्रलंबित घणसोली-ऐरोली खाडीपूल व रस्त्याच्या कामावर महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली असून पुलाला काटई-ऐरोली रस्त्याची जोड दिली जाणार आहे. त्यामुळे पूर्वीचा १.९५ म्हणजे सुमारे २ किलोमीटरऐवजी हा उड्डाणपूल ४ किलो मीटरचा होणार आहे.

महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने वाशी सेक्टर १७ येथे पामबीच मार्गाहून सायन-पनवेल महामार्गावर जाण्याकरिता २९० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे कामही सुरू केले आहे. या पुलामुळे नागरिकांचा प्रवासातील वेळ आणि इंधनाची बचत होईल.(navi mumbai news)

महापे उड्डाणपुलावरून ठाणे-बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी एक वेगळा आर्म तयार केला जाणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बेलापूर, नेरूळ आणि तुर्भे येथे प्रत्येकी एक असे तीन वेगवेगळे पूल तयार होत असल्‍याने लवकरच नवी मुंबईकरांचा प्रवास सुसाट होईल.

बेलापूरच्या वाहतूक कोंडीवर उतारा


सीबीडी-बेलापूर हे नोड वाणिज्य दृष्‍टिकोनातून महत्त्वाचे आहे. रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या राष्ट्रीयकृत सरकारी, निमसरकारी आणि खासगी बँका आहेत. विविध कॉर्पोरेट कार्यालये, लॉजिस्टिक कंपन्यांचे कार्यालये, कॉलसेंटर रेल्वे स्थानकाच्या इमारतींमध्ये आहे.

बेलापूरमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दिवाळे गावमार्गे सायन-पनवेल महामार्गाला जोडण्यासाठी एक पूल उभारण्यात येणार आहे. नेरूळ फेज १ आणि नेरूळ सेक्टर २१ व २८ हे भाग जोडण्यासाठी अंतर्गत दुसरा पूल तयार केला जाणार आहे.

त्याचा अहवाल तयार असून सुमारे २२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील ५० टक्के खर्चाची रक्कम महापालिकेने सिडकोकडे मागितली आहे.

तुर्भे पुलाच्या आर्मकरिता एमएमआरडीएला साकडे


तुर्भे पुलाला फायजर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी एक मार्ग बांधण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित तांत्रिक व वित्तीय अहवाल तयार करण्यात आला आहे.

सल्फर कंपनीची नऊ मीटर जागा संपादित करावी लागणार असल्याने यात बदल करून ठाणे-बेलापूर रस्त्यावरून सायन-पनवेल उड्डाणपुलावर आर्म उभारणे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. या प्रकल्पाकरिता १२६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएकडे निधीची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी BMC आयुक्तांची निवृत्तीनंतर राज्यमंत्री दर्जाच्या पदी नियुक्ती, IAS इकबाल सिंह चहल यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

Stock Market Today : बजेटपूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण! मात्र तिमाही निकालामुळे या शेअरमध्ये तेजी; कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतापदासाठी संजय महाकाळकर यांचं नाव जवळपास निश्चित

‘मन जुळले’ने उलगडली ‘रुबाब’ची प्रेमळ बाजू! ‘रुबाब’ चित्रपटातील रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

मोहसिन नक्वींना पाकिस्तानचा पंतप्रधान कोण, हेच माहित नाही अन् चालले T20 World Cup वर बहिष्कार टाकायला! चोप्राने उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT