Crime News Esakal
मुंबई

Crime News: झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने ओतले ॲसिड; कारण ऐकून बसेल धक्का

कोलकत्ता पोलिसांनी झिरो नंबरवरून दाखल केलेला गुन्हा पनवेल तालुका पोलिसांकडे वर्ग केला | Tuhjnjgyghe Kolkata Police transferred the case filed by Zero Number to the Panvel Taluka Police

CD

Crime News: झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून फरार झालेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी पनवेल रेल्वे स्थानकातून अटक केली आहे.

रमजान सिद्धिकी गाझी (वय २८) असे आरोपी पतीचे नाव असून त्याने मंगळवारी (ता. २०) पहाटे पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले. या हल्ल्यात गंभीररीत्या भाजलेली विवाहिता सध्या पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

अमिना खातुन ऊर्फ अमिन बिबी रमजान गाझी (वय २८) असे पीडितेचे नाव असून ती मूळची पश्चिम बंगालमधील आहे. अमिना ही पती रमजान गाझी याच्यासह मोलमजुरी करून वावंजे येथील खैरणे गावात रिझवान कंपनीजवळ राहत होती.

रमजान याची बहीण हैदराबाद येथे राहण्यास असून या बहिणीकडे जाण्यासाठी रमजानने अमिना हिच्यामागे तगादा लावला होता. याला अमिनाने नकार दिला. या वादातून सोमवारी (ता. १९) रात्री दोघांमध्ये भांडण झाले होते.

या रागातून रमजानने मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अमिना ही झोपेत असताना तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून घटनास्थळावरून पोबारा केला. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या अमिनाला शेजाऱ्यांच्या मदतीने पनवेलमधील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उपचारार्थ तिने पश्चिम बंगाल येथील माहेर गाठले.

त्यानंतर तिने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने कोलकत्ता येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत तेथील बनियापुकूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर कोलकत्ता पोलिसांनी झिरो नंबरवरून दाखल केलेला गुन्हा पनवेल तालुका पोलिसांकडे वर्ग केला.

आरोपीला पोलिस कोठडी


बनियापुकूर पोलिसांनी पनवेल तालुका पोलिसांना सदर गुन्हा वर्ग करताच फरार झालेल्या रमजान गाझी याचा शोध सुरू केला.

पोलिस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलिस हवालदार सतीश तांडेल, पोलिस शिपाई राजू सोनकांबळे, भीमराव खताळ व पथकाने तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेऊन त्याला गुरुवारी रात्री पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: अमित शाह लोणीमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT