Railway News sakal
मुंबई

Railway News: आंगणेवाडी जत्रेकरिता धावणार एलटीटी-करमाळी विशेष ट्रेन

Railway News: LTT-Karmali special train will run for Anganwadi fair

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Train News: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेकरिता मुंबईतून जाणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमाळी या स्थानकांदरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेन क्र. ०१०४३ एलटीटी-करमाळी विशेष गाडी शुक्रवार, १ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजता सुटून करमाळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचणार आहे. ट्रेन क्र. ०१०४४ करमाळी-एलटीटी स्पेशल ट्रेन रविवारी (ता. ३) दुपारी ३.२०ला सुटून एलटीटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ ला पोहोचेल.(Anganvadi News)

या रेल्वेला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबा दिला आहे. २१ डब्यांची एलएलबी कोचची ही स्पेशल ट्रेन धावणार असून, तिचे आरक्षण २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SOORYAVANSHI: क्रिकेट सोडा, वैभवचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क! वाघाच्या शोधात जंगलात पोहोचला ‘बेबी बॉस’, पण शेवटी...

Crime: भयंकर! ५ रुपये खर्च केले म्हणून आई संतापली; चिमुकल्याला ३ दिवस घरात कोंडलं, नंतर तळव्यांना दिले चटके

Koyana Dam : कोयनेचे दरवाजे एक फुटावर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Akola News : आ. साजिद खान पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Baramati News : बारामतीच्या अथर्व पवार यांची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षेत उत्तुंग कामगिरी

SCROLL FOR NEXT