watermelon roha to dubai export esakal
मुंबई

Watermelon Roha to Dubai: रोह्यातील शेतकऱ्याचा कलिंगड थेट दुबईला रवाना

केशव खरिवले यांच्या कलिंगड पिकाला मिळाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

CD

रोहा, ता. २७ (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील सांगडे गावचे शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सर्वपरिचित असलेले केशव खरिवले यांच्या कलिंगड पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली अाहे. त्यांनी पिकविलेली कलिंगडे थेट दुबईला रवाना झाली आहेत.

केशव खरिवले यांनी विकसित बियाण्यांचा वापर करून नवा प्रयोग केला. त्यांच्या या प्रयोगास यश मिळून कलिंगड पिकाचे उत्पादनही चांगले आले. याशिवाय फळेही आकाराने मोठी आली आहेत. कलिंगड पिकाचा दर्जा व मोठे फळ आल्याने मुंबईतील काही फळविक्रेते, तसेच व्यापाऱ्यांनी खरिवले यांच्या शेतीतील कलिंगडे खरेदी करणे पसंत केले.

मुंबईतील व्यापाऱ्यांनी दुबईतील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असता त्‍यांनी कलिंगडाचा दर्जा, चव आवडल्‍याचे सांगितले. पिकलेला सर्वच माल खरेदी करून खरिवले यांच्या कलिंगडाला थेट दुबईची बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

विकसित बियाण्याचा वापर
शेती क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे केशव खरिवले यांनी यंदाच्या हंगामात तालुक्यातील घोसाळे येथे कलिंगड पिकाची शेती केली. विकसित बियाण्याचा वापर करून नवा प्रयोग केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT