मुंबई

हिरकणी कक्ष म्‍हणजे महिलांसाठी हक्‍काचे दालन

CD

हिरकणी कक्ष म्‍हणजे महिलांसाठी हक्‍काचे दालन
- मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्‍ते कक्षाचे उद्‌घाटन
रोहा, ता. २७ (बातमीदार) ः हिरकणी कक्ष म्हणजे महिलांसाठी हक्काचे दालन आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. रविवारी (ता. २५) तटकरे यांच्या हस्ते फीत कापून हिरकणी कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले, त्यावेळी त्‍या बोलत होत्‍या.
आदिती तटकरे म्‍हणाल्‍या की, रोहा तहसील व प्रांत कार्यालयाप्रमाणे अन्य शासकीय कार्यालये एकाच संकुलात उभी आहेत. कार्यालयात आपापल्या कामानिमित्त रोज शेकडो महिला येतात. याआधी त्यांची गैरसोय होत असे. या गोष्टीकडे महसूल विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष देत हिरकणी कक्ष सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्या दृष्टीने कामदेखील मार्गी लागले आहे, असे त्‍यांनी सांगितले.
या वेळी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, अप्पर तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, पोलिस निरीक्षक देविदास मुपडे, नायब तहसीलदार राजेश थोरे आदी उपस्थित होते.

फोटो केप्शन : हिरकणी कक्षाचे फीत कापून उद्‌घाटन करताना मंत्री आदिती तटकरे. त्‍यांच्यासमवेत प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, नायब तहसीलदार राजेश थोरे आदी मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT