uran railway Sakal
मुंबई

Mumbai Local: उरण रेल्वे मार्गावर महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण; जाणून घ्या काय आहे कारण

ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. रात्रीच्‍या वेळी महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.

CD

Uran News: उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाका मार्गावर पथदिवे नसल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. रात्रीच्‍या वेळी महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्‍यामुळे परिसरात पथदिवे बसवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

नुकतीच उरण रेल्‍वे सुरू झाल्‍याने त्‍याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रोज रेल्वे प्रवास करणाऱ्यांमध्ये चाकरमान्‍यांबरोबर शालेय विद्यार्थी, महिला, ज्‍येष्ठ नागरिक, दिव्यांग यांचा मोठा सहभाग आहे. सकाळ व संध्याकाळ येथील रेल्‍वे मार्गावर प्रवाशांचा राबता असतो; परंतु उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाका मार्गावर पथदिवे नसल्याने संध्याकाळनंतर पूर्णतः अंधार पसरलेला असतो.

त्यामुळे शाळा-कॉलेज विद्यार्थी, महिला, दिव्यांग, ज्‍येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन अंधारातून पायपीट करावी लागते. शिवाय अंधाराचा फायदा घेऊन लूटमार, चोरी, छेडछाड असे प्रकार झाल्‍याचेही सांगण्यात येत आहे. त्‍यातच या मार्गावर पोलिसांची गस्‍तदेखील नसल्‍याने महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्‍यामुळे संबंधित प्रशासनाने या मार्गावर तत्‍काळ दिवाबत्तीची सोय करावी, अशी मागणी येथील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.


उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाकापर्यंत रस्त्यावर पथदिवे नसल्याने संध्याकाळनंतर पूर्णतः अंधार पसरला जातो. या अंधाराचा फायदा घेऊन येथे अनेक अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे येथे शक्यतो लवकरात लवकर प्रशासनाने पथदिवे बसवण्याची व्यवस्था करावी.


- मुकुंद पाटील, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT