sndt collage girls  sakal
मुंबई

Mumbai News: ''एसएनडीटी''च्या विद्यार्थिनींनी समजून घेतला मुंबईचा इतिहास

नजीकच्या भविष्यात विद्यार्थ्यांसाठी हेरिटेज वॉक आयोजित करण्यासाठी दोन क्रेडिट शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना विद्यापीठ प्रशासनाची आहे |

सकाळ वृत्तसेवा

Mumabai News: एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी बुधवारी (ता. २८) दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात ‘हेरिटेज वॉक’ केला.

मुंबईतील वारसास्थळांचा इतिहास समजून घेण्यासाठी या वॉकचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या पदव्युत्तर आणि पदवीपूर्व इतिहास विभाग तसेच एसएनडीटी कला महाविद्यालय, चर्चगेटच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला गेला.


हेरिटेज वॉकमध्ये प्रामुख्याने ओव्हल मैदानाभोवती असलेल्या व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको आर्टच्या इमारतींचा समावेश करण्यात आला. पश्‍चिम रेल्वे मुख्यालय, मुंबई उच्च न्यायालय, राजाबाई टॉवर, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, वेलिंग्टन फाऊंटन, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि काळा घोडा आर्ट डिस्ट्रिक्टम यांसारख्या इमारतींचा गौरवशाली वारसा विद्यार्थ्यांनी या वॉकच्या माध्यमातून समजून घेतला.

एसएनडीटी कला महाविद्यालय तसेच विद्यापीठाच्या इतिहास, मानसशास्त्र, इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. शिक्षिका शलाका तोरणे, मेहविश शेख, ऋचा शहा, नम्रता ढवळे आणि स्वराली सायकर यांनी मार्गदर्शन केले.

हेरिटेज वॉकमुळे आपल्या वारसास्थळांकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक झाला. तसेच मुंबईची जीवनशैली, वास्तूरचनेची माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिली. या प्रकारचे उपक्रम नेहमी आयोजित करण्याचा मानस वॉकच्या समन्वयक व सहायक प्राध्यापक नम्रता गणेरी यांनी बोलून दाखवला.

नजीकच्या भविष्यात विद्यार्थ्यांसाठी हेरिटेज वॉक आयोजित करण्यासाठी दोन क्रेडिट शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना विद्यापीठ प्रशासनाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तूस्थळांची माहिती होईल.


- जास्वंदी वांबुरकर, प्राचार्य व इतिहास विभागप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT