mumbai local mega block  sakal
मुंबई

Mumbai Local News: मुंबई लोकल रोजच लेट; प्रवाशांना सहन करावा लागतोय गर्दीचा त्रास

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local: लोकलच्या वारंवारतेबद्दल शिस्तबद्ध अशी ओळख असलेल्या पश्चिम रेल्वेची वारंवारता घसरली आहे. सकाळ व संध्याकाळच्या वर्दळीच्या वेळी पश्चिम लोकल या दररोज १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना दररोज कार्यालयात पोहोचण्यात लेटमार्क लागत आहे.

रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गापेक्षा पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा या वेळेत धावत असल्याची सर्वत्र ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम रेल्वेची ही ओळख पुसत चालल्याचे दिसून येते. याबाबत अनेक प्रवाशांनी पश्चिम रेल्वेकडे सोशल मीडिया आणि लेखी तक्रार करूनही त्याकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

पश्चिम उपनगरातील गोरेगाव स्थानकातून मोठ्या संख्येने प्रवासी हे चर्चगेटच्या दिशेने दररोज प्रवास करत असतात. विरार, बोरिवली लोकल या प्रवाशांनी भरूनच येत असल्यामुळे गोरेगावकर, जोगेश्वरीच्या प्रवाशांसाठी खासदार गजानन कीर्तीकर यांनी रेल्वेशी संपर्क करून गोरेगाव लोकल सुरू केल्या होत्या.

सकाळी ८.२५, ८.५७ , ९.३३ व ९.५३ या गोरेगाव लोकल सकाळी सुटतात. मात्र, दररोज या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने सुटत आहेत, याचा नाहक त्रास प्रवाशांना होत असून त्यांना ऑफिसला पोहोचण्यास लेटमार्क लागत आहे.


मंगळवारी चर्चगेटहून ७.१९ ची लोकल स्थानकातून वेळेवर सुटली तर दादरला पोहोचण्यासाठी १५ मिनिटे विलंब लावला. तसेच वर्दळीच्या वेळी लोकलला दररोज होणाऱ्या विलंबाकडे पश्चिम रेल्वेचे अधिकारी लक्ष देतील का, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून दररोज गोरेगाव लोकल सेवा विलंबाने सुटत असल्याने कार्यालयात आम्हाला पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. रेल्वेने प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन तत्काळ गोरेगाव लोकल वेळेत सोडावी.
- राकेश पाटील, प्रवासी

अनेकदा यासंदर्भात रेल्वेकडे सोशल मीडियावर तक्रारी केल्या आहे. मात्र, तरीसुद्धा पश्चिम रेल्वेकडून गोरेगाव लोकल वेळेवर सोडत नाही, कार्यालयात उशिरा पोहोचल्यानंतर वरिष्ठांचे बोलणे ऐकावे लागते. त्यामुळे महिलांची अडचण समजून गोरेगाव लोकल वेळेत सोडावी.
- भाग्यश्री मुरकुटे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT