Railway News sakal
मुंबई

Railway News: पनवेल-कर्जत रेल्वेच्या कामाला वेग; प्रवाशांना लवकरच मिळणार दिलासा

प्रकल्पाच्या प्रगतीसह प्रवाशांची प्रतीक्षा संपणार; चिखले स्टेशनसाठी गर्डर उभारणी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील चिखले स्थानकासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे.

पुलाच्या चारपैकी तीन गर्डरची यशस्वी उभारणी बुधवारी (ता. २८) करण्यात आली. मार्चअखेर शेवटचा गर्डर उभारून पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ४७ टक्के दुहेरी मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.

रेल्वे प्रकल्पांतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील चिखले स्टेशनसाठी रेल्वे उड्डाणपुलाची उभारण्यात येत आहे. पुलाच्या चारपैकी तीन गर्डरची यशस्वी उभारणी बुधवारी करण्यात आली. पनवेल ते कर्जतदरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉरसाठी ६१ मीटर अप रेल्वे मार्गिका आणि डाऊन रेल्वे मार्गिकासाठी गर्डर उभारणी करण्यात येत आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि वाहतूक पोलिसांकडून ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. २५० मेट्रिक टन वजनाचा गर्डर १४० कर्मचारी आणि क्रेनच्या माध्यमाने गर्डर सरकवून निश्चित जागी बसविण्यात आला आहे.


गर्डरची कामे अशी


पहिला गर्डर नोव्हेंबर २०२३ मध्ये उभारण्यात आला होता. जानेवारी महिन्यात दुसरा आणि तिसरा गर्डर फेब्रुवारीत उभारण्यात आला आहे. मार्चमध्ये शेवटचा गर्डर उभारल्यानंतर द्रुतगतीवरील पुलाचे काम पूर्ण होणार आहे. यंदाच्या मार्चअखेर पुलाचे उर्वरित दोन गर्डर उभारून पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई रेल्वे विकास महामंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT