mega block in mumbai sakal
मुंबई

Mumbai Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; प्रवास करण्याआधी वाचा संपूर्ण माहिती

पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीम अप-डाऊन धीम्या मार्गांवर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे |Western Railway will have night megablock on Santacruz to Mahim up-down slow routes

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ३) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीम अप-डाऊन धीम्या मार्गांवर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.(mumbai mega Block)

मध्य रेल्वे


कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्ग
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम
ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकापासून डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर त्या थांबतील.(central Line Mumbai Mega Block)

हार्बर रेल्वे


कुठे : मानखुर्द ते नेरूळ अप आणि डाऊन मार्ग
कधी : सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत

परिणाम
ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे


कुठे : सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्ग
कधी : शनिवार रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत

परिणाम
ब्लॉकदरम्यान अप मार्गावरील काही धीम्या लोकल सेवा अंधेरी ते चर्चगेटदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या धीम्या गाड्या अंधेरी-वांद्रे-दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद गाड्यांप्रमाणे धावतील. विशेष म्हणजे रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसेल.(mega block mumbai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT