मुंबई

Mumbai Metro: ‘मेट्रो-९’ मार्गावर साडेआठ तासांत बसवले २२ गर्डर!

Mumbai NEws | पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीत कोणताही अडथळा न आणता ही मोहीम फत्ते केली.

सकाळ वृत्तसेवा


Mumbai Metro News: मेट्रो-९ या दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या मार्गाचे काम वेगात सुरू आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शुक्रवारी रात्रीपासून साडेआठ तासांत २२ महाकाय गर्डर बसवण्याची विक्रमी कामगिरी केली. पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीत कोणताही अडथळा न आणता ही मोहीम फत्ते केली.(mumbai news)

मेट्रो मार्गावर सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग आणि दहिसर पूर्व या तीन उन्नत स्थानकांचे काम करणे आणि त्याचे आरसीसी प्री-कास्टिंग गर्डर बसवण्याचे मोठे आव्‍हान ‘एमएमआरडीए’समोर होते.

त्यासाठी आवश्यक असलेले प्री कास्टिंग केलेले अवजड गर्डर एमएमआर क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वाहून आणावे लागणार होते.()

त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा होण्याची भीती होती. हे टाळण्यासाठी एमएमआरडीएने चोख नियोजन करून रात्री हे काम करण्याचे निश्‍चित केले.

त्यानुसार शुक्रवारी रात्री १० ते शनिवारी सकाळी ६.३० पर्यंत विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केले, अशी माहिती एमएमआरडीएने दिली. तीन स्थानकांत हे गर्डर बसवण्यात आल्याने संबंधित स्थानकाच्या कामाला वेग येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT