thane news  sakal
मुंबई

Thane News: ठाण्यात आता चार सदस्यांचाच प्रभाग!

ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकारकडेही मंजुरीसाठी पाठवली होती.

सकाळ वृत्तसेवा


Thane News: अनेक वर्षांपासून महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग रचना बदलण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते.

त्यामुळे एक प्रभाग किती सदस्यांचा असेल, याबाबत चर्चांना उधाण आले होते. त्यात नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईवगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चारसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार आता ठाणे महापालिका निवडणुकीतही चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्याही वाढणार नसल्याचे दिसत आहे.


२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीनसदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.

त्या दृष्टीने पालिकेने मागील वर्षी जुलै महिन्यात आरक्षण सोडत काढून निवडणुकीची प्रक्रियाही पूर्ण केली होती. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकारकडेही मंजुरीसाठी पाठवली होती.

मात्र, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीसचे सरकार आले. त्यानंतर निवडणूक चारसदस्यीय पॅनल पद्धतीने घेण्याची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढण्यात आलेला नव्हता. अखेर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चारसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रभाग रचना बदलणार


दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने यापूर्वी तीनचा पॅनल केला होता. त्यामुळे नगरसेवकांची संख्याही ११ ने वाढून १४२ होणार होती. तर प्रभागांच्या संख्येत वाढ होऊन ४२ प्रभाग होणार होते. मात्र, दुसरीकडे आताच्या नव्या अध्यादेशामुळे चार सदस्य पॅनल पद्धतीनुसार प्रभाग रचना तयार करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT