Chagan Bhujbal esakal
मुंबई

Chhagan Bhujbal: भुजबळांना कोर्टाचा दिलासा; वॉरंट केले रद्द

न्यायालयाने त्यांच्याविरोधात जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे |The court has canceled the non-bailable warrant issued against him

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयात गैरहजर राहिल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेले वॉरंट विशेष न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे.

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री असताना महाराष्ट्र सदन येथील जमीन खरेदी-विक्री आदी कामांचे कंत्राट देताना त्यात घोटाळा झाल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये भुजबळांसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

सत्र न्यायालयात आरोपींच्या दोषमुक्ततेवर सुनावणी सुरू आहे. विशेष न्यायालयात छगन भुजबळ स्वतः हजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT