मुंबई

आनंद विश्व गुरुकुल घंटाळी देवी चषकाचा मानकरी

CD

ठाणे, ता. ३ (बातमीदार) : श्री घंटाळी देवी चषक क्रिकेट स्पर्धेत आनंद विश्व गुरुकुल शाळेने साखळी सामन्यात सर्व नामांकित शाळांना पराभूत करत आपली छाप उमटविली आहे. यामध्ये आयुष शेटे हा सामनावीरचा मानकरी ठरला. त्यामुळे त्याला सन्मानित केले.

घंटाळी प्रबोधिनी संस्था ठाणे आणि सोवेनिर क्लब आयोजित ‘घंटाळी देवी चषक २०२४’ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत आनंद विश्व गुरुकुल संघाने वसंत विहार हायस्कूल संघावर ७ गडी राखून विजय संपादन केला. आयुश शेटे याने नाबाद ३८ धावा केल्या; तसेच २ गडी बाद करत तो सामनावीरचा मानकरी ठरला; तर दोन शतक आणि ६ बळी मिळवित चमकदार कामगिरी केल्याने त्याला मालिकावीर म्हणून सन्मानित केले.

आनंद विश्व गुरुकुलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या वसंत विहार स्कूलने ३४.४ षटकांत सर्व गडी बाद फक्त ६६ धावा केल्या. यात ओम पवार आणि नीर जैन या दोन फलंदाजांनी २ अंकी धावा काढल्या, तर बाकीचे सर्व फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. योग मोता, मोक्ष निकम आणि आयुष शेटे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर आनंद विश्व गुरुकुलने अवघ्या १३.३ षटकांत ३ गड्यांच्या बदल्यात ७० धावा करून हा विजय संपादन केला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी सहसचिव रत्नाकर शेट्टी, क्युरेटर नदीम मेनन, माजी नगरसेवक दशरथ पालांडे, शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, क्रिकेटपटू अतुल फणसे आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर स्पर्धेचे घंटाळी प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष विलास सामंत, उपाध्यक्ष चैतन्य सामंत, ठाणे महापालिकेचे अधिकारी राजेंद्र गावित, स्पर्धेचे समन्वयक सागर जोशी, नम्रता ओवळेकर-राणे, भरत शर्मा आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT