मुंबई

पेण खारेपाट सिंचन पाणी प्रश्न मार्गी

CD

पेण खारेपाट सिंचन पाणीप्रश्न मार्गी
सुधारित प्रकल्‍पाला वित्त व नियोजन विभागाची मंजुरी
पेण, ता. ३ (वार्ताहर) : पेण तालुक्यात खारेपाट विभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्‍यामुळे हेटवणे कालव्याच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय प्रस्तावाला मंजुरी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी खारेपाट विकास संकल्प संघटनेकडून उपोषण करण्यात आले होते. अखेर त्‍यांना यश मिळाले आले. या प्रस्तावास वित्त व नियोजन विभागाने मंजुरी दिल्यामुळे सदरचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
खारेपाट विकास संकल्प संघटना यांच्या माध्यमातून २४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले होते. यावेळी राज्य सरकारच्या चाललेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात आमदार जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरे यांनी सभागृहाचे लक्ष या प्रश्नांकडे वळवले होते. तर मागच्या दोन दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून याबाबतची वस्तुस्थिती मांडली. त्यावरून हेटवणे मध्यम प्रकल्पाला सुप्रमा मिळावी, असे सांगून येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात येईल, असे सांगण्यात आले. यावरून उपोषणाच्या सातव्या दिवशी १ मार्च रोजी विधानभवनात उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्रालयस्तरावरील अधिकारी तसेच क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमा प्रस्तावावर वित्त व नियोजन विभागाची सहमती होऊन सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जलसंपदा विभागाकडे सादर झालेला आहे. त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सदर प्रस्ताव येत्या आगामी व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत मांडण्यात येईल व सदर प्रस्तावाला मंजुरी घेण्यात येईल, असे जलसंपदा अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांना सांगितले. तसे पत्रही दिल्यामुळे सदर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, महेंद्र ठाकूर, राजन झेमसे, समीर म्हात्रे, दिलीप पाटील, आर. जे. म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, प्रितेश माळी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT