मुंबई

...तर सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान

CD

...तर सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान
- घरेलू कामगार सुरक्षा परिषदेत सरकारला इशारा
चेंबूर, ता. ३ (बातमीदार) ः येणाऱ्या निवडणुकांपूर्वी राज्यातील घरेलू कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी, अन्यथा सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करू, असा इशारा घरेलू कामगारांनी आझाद मैदानात झालेल्‍या सुरक्षा परिषदेमध्ये दिला. आपल्‍या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने घरेलू कामगार सुरक्षा परिषद घेण्यात आली.
या परिषदेत राज्यातील हजारो घरेलू कामगार महिलांनी सहभाग घेतला. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि लोकशाही प्रक्रियेला धक्का लागेल असा कोणताही विचार आणि व्यवहाराला आमचा विरोध असेल. समान आणि किमान वेतनाचा हक्क हा कामगारांचा मूलभूत अधिकार आहे, शिक्षण आणि आरोग्य याचे व्यापारीकरण थांबवून घर कामगार स्त्रियांना आरोग्य विम्याचे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे कायदेशीर अधिकार द्यावेत, कामगारांना ग्रॅच्युईटी, बोनस, निवृत्ती वेतन द्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्‍या. जाहीरनाम्‍याची सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी पूर्तता न केल्‍यास विरोधात जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या परिषदेत ठरवण्यात आलेल्या जाहीरनाम्याला मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी पाठिंबा दिला; तर कॉ. उदय भट, नीलाताई लिमये, मंगलाताई बावस्कर, अनिताताई गोरे, शांताताई खोत, मेकॅंजी डाबरे, सुभाष मराठे, ज्ञानेश पाटील, राजू वंजारे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''कॅमेऱ्याचा एँगल नाही, हृदयाचा एँगल बदला'', भर सभागृहात प्रियंका गांधींकडून मोदींवर बोचरी टीका; नेमकं काय म्हणाल्या?

Mumbai Crime: MIDC पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरीत्या मुंबईत राहणारे ७ बांगलादेशी तृतीयपंथी जेरबंद; सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश

Kasari Green Revolution: कासारी गावातील ओसाड गायरानात १००० रोपांची लागवड; ५००० झाडांचे लक्ष्य, ठिबक सिंचनासह हरित क्रांतीचा संकल्प

Mumbai News: रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला, उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान विचित्र प्रकार; नेमकं काय घडलं?

Chitrakoot Crime News: NEET विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चित्रकूटमध्ये ३७४ CCTV, ६ हजार कॉल्स तपासले, मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

SCROLL FOR NEXT