मुंबई

नवी मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक वाहतूकीवर भर

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : नवी मुंबई शहरात ४० किलोमीटरचे नवे सायकल ट्रॅकचे नियोजन महापालिकेने केले आहे. शहरातील कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणि पर्यावरणपूरक दळणवळण व्यवस्था निर्माण करणे हा त्यामागे हेतू आहे. याआधी महापालिकेने नेरूळ आणि वाशी येथे सायकल ट्रॅक तयार केले आहेत. यात आणखीन नवीन मार्गांवर सायकल ट्रॅक तयार केले जाणार आहेत.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असतात. जन सायकल सहभाग प्रणाली योजना राबवून नवी मुंबई महापालिकेने नागरिकांना सायकल आणि बॅटरीवरील दुचाकी भाडेतत्त्वावर उपलब्ध केली आहे. याआधी महापालिकेने वाशी येथे सागर विहार परिसर ते सेक्टर नऊपर्यंत सुमारे दोन किलोमीटरचा सायकल ट्रॅक तयार केलेला आहे. नेरूळला पामबीच रस्त्यालगत सेवारस्त्यावर सायकल ट्रॅक तयार केला आहे. पामबीच मार्गावर नऊ मीटरच्या जागेच्या मध्येच हा ट्रॅक तयार केला आहे. सध्या महापालिकेतर्फे नवीन तयार केले जाणारे सायकल ट्रॅक हे अडीच ते तीन मीटर रुंदीचे असणार आहेत. सायकल ट्रॅक निर्मितीकरिता पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या पट्ट्यांचा वापर केला जाणार आहे.

----------------------------------
येथे असणार नवीन सायकल ट्रॅक
- घणसोली- ऐरोली रस्त्याच्या कडेला आठ किलोमीटरच्या ट्रॅकचे मार्किंग सुरू.
- ऐरोलीला डीएव्ही शाळा ते सेक्टर १४, १५ येथे ३.२ किलोमीटरचा ट्रॅक.
- पटनी रोडवर इच्छापूर्ती गणेश मंदिर ते पटनी कंपनीपर्यंत सहा किलोमीटरचा ट्रॅक.
- नेरूळला ज्वेल ऑफ नवी मुंबईत सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे.
- पामबीच मार्गावरील सेवा रस्त्यालगत नऊ किलोमीटरचा ट्रॅक.
- बेलापूर येथील रमाबाई नगर वसाहतीपासून ते खारघर रेनट्री हीलपर्यंत ४.२ किलोमीटर ट्रॅक.

--------
नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा. यातून सुदृढ आरोग्याला आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. त्याकरिता महापालिकेतर्फे भविष्यात नवीन सायकल ट्रॅकचे नियोजन केले जात आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

---------------------------------
पामबीच मार्गावर सूचना फलक लावणार
पामबीच मार्गावर सायकलने जाणाऱ्या अवतार सिंह सैनी यांचा काही दिवसांपूर्वीच अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी निषेध करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पामबीच मार्गावर सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना महापालिका आणि वाहतूक विभागाने बंदी घातली आहे. याआधी पहाटे धावणाऱ्या व्यक्तींना गस्तीवरील पोलिसांच्या वाहनाची धडक झाली होती. मात्र, त्यानंतरही या घटनांना आळा बसत नसल्याने अखेर या मार्गावर दर्शनी भागात दिसेल, असे फलक लावण्यात येणार असल्याचे समजते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT