मुंबई

शासन आपल्या दारीसाठी कल्याणवारी

CD

राजीव डाके
ठाणे शहर, ता. ३ : हल्ली प्रचारफेरी, रोड शो, सभा यांसारख्या कार्यक्रमाला गर्दी दाखवायची असेल तर भाड्याने माणसे आणावी लागतात; पण आता तर कर्मचारीदेखील अशा पद्धतीने मिळू लागले आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या कल्याणमध्ये झालेल्या कार्यक्रमात अशीच काहीशी चर्चा पसरली होती. विशेष आदेश काढून सर्व महापालिकांनी त्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांना येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या लेखी आदेशासोबतच गळ्यात पालिकेचे ओळखपत्र घालायचे नाही, गणवेशात यायचे नाही, लोकांमध्ये बसायचे असे तोंडी आदेश काढले होते.

रविवार (ता. ३) महाराष्ट्र सरकारच्या वतीने कल्याणमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम झाला. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी जिल्हाभरातून लोकांना बोलावले होते. मात्र, त्याचवेळी सर्व प्रशासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनादेखील कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ठाणे जिल्हाधिकारींच्या माध्यमातून हे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेनेही या आदेशाची अंमबजावणी केली. प्रत्येक प्रभाग सहायक आयुक्तांमार्फत पालिका कर्मचाऱ्यांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याची सक्ती केली होती.

कार्यक्रमाला उपस्थित न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी तंबीदेखील लेखी आदेशात दिली होती. त्यासाठी त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी बसची सुविधा पुरवली होती; मात्र लेखी आदेश देतानाच या सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेचा गणवेश न घालण्याचे आणि पालिकेचे ओळखपत्र सोबत न ठेवण्याचे तोंडी आदेश देण्यात आल्याचे काही कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सेल्फी काढण्याची सक्ती
प्रभागानुसार ग्रुप तयार करून कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांमध्ये बसलेल्या त्या त्या ग्रुपचा सेल्फी फोटोदेखील सहायक आयुक्तांना पाठवा, असे या तोंडी आदेशात तंबी दिल्याची माहितीदेखील या कर्मचाऱ्याने सांगितली. ठाण्यातील काही प्रभागात गरजू आणि गरीब महिलांना शिलाई यंत्र, घरघंटी यंत्रांचे वाटप झाले. माजी नगरसेवकांच्या माध्यमांतून हा कार्यक्रम घेण्यात आला. या लाभार्थ्यांना कार्यक्रमाला गाड्यांची व्यवस्था करून घेऊन जाण्यात आले. कार्यक्रमाला नाही आलात, तर दिलेली वस्तू परत घेतली जाईल, असे सांगण्यात आल्याचे काही महिलांनी सांगितले.

प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी
अधिकाऱ्याने आपापल्या प्रभागातील किमान ५४ महिलांना नेण्याची व्यवस्था करायची. त्यासाठी वाहन उपलब्ध करून द्यायचे, असे आदेश वरून आल्याचे काही अधिकारी खासगीत सांगत होते. ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील सुमारे १,५०० सफाई कर्मचाऱ्यांना अशी कल्याणवारी घडविण्यात आली. प्रत्येक पेटीवर असलेल्या मुकादम, सुपरवायझर यांच्यावर त्या-त्या पेटीवरील कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली होती. पेटीच्या लीडरमार्फत सगळी माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम होते.

सफाई कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाणे यात काही गैर नाही; पण त्यांना प्रेक्षक म्हणून घेऊन जाणे हे संताप आणणारे आहे. या कर्मचाऱ्यांना येथे कामासाठी घेऊनच जायचे होते तर मग गणवेशात आणि ओळखपत्र गळ्यात घालून का नेण्यात आले नाही? या कर्मचाऱ्यांना या दिवसाचा पगार देणार असाल तर मग त्या बदल्यात त्यांच्याकडून तिथे कोणते काम करून घेतले? लोकांमध्ये बसवून गर्दी वाढवणे हे त्यांचे काम नव्हे. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे.
-जगदीश खैरालिया, जनरल सेक्रेटरी, श्रमिक जनता युनियन संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल होणार? उच्चस्तरीय टास्क फोर्सची स्थापना; PM मोदींची मोठी घोषणा

Madha Vitthal Temple : परतीच्या वारीत माढ्यातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी; दर्शनासाठी रांगा

Career Katta Paliwala College : पालीवाला महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी उत्साहात; विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला नवी दिशा

IND vs ZIM: पहिलाच बॉल अन् वैभव सूर्यवंशीचा भारी झेल, गोलंदाज मयंक यादवची भुवनेश्वर कुमारच्या रेकॉर्डशी बरोबरी; पाहा Video

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

SCROLL FOR NEXT