ऐरोलीतील अग्निशमन केंद्राचे काम पूर्णत्वास
सहा गाड्यांचा ताफा दाखल; आपत्कालीनमध्ये मोठा दिलासा
वाशी, ता. ३ (बातमीदार) : ऐरोली सेक्टर तीन येथील नवी मुंबई अग्निशमन केंद्राची जुनी इमारती तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या इमारतीमधून केंद्राचे कामकाज सुरू होणार आहे. शिवाय सहा गाड्या येथील दलात दाखल होणार असल्याने ऐरोलीकरांना तसेच येथील घणसोली पट्ट्यातील कंपन्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मोठी मदत मिळणार आहे.
ऐरोली अग्निशमन केंद्राच्या इमारतीची आणि इथल्या कर्मचारी वसाहतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. या दोन्ही इमारती सिडकोकालीन होत्या. पस्तीस वर्षांपूर्वीचे बांधकाम अत्यंत जीर्ण झाले होते. ही इमारत जीर्ण झाल्याने वारंवार दुरुस्ती करावी लागत होती. तर कर्मचाऱ्यांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सिडकोकालीन असणारी जुनी इमारत तोडून नवीन इमारत बांधण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. सध्या या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच उद्घाटन होणार असल्याचा दावा पालिकेच्या अभियंतांकडून केला जात आहे. पालिकेकडून अग्निशमन दलाच्या इमारतीचे काम सुरू असल्यामुळे ऐरोली सेक्टर १५ मधील हेगडे भवनच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात पालिकेचे अग्निशमन केंद्र हलवण्यात आलेले आहे. पूर्वी ऐरोली अग्निशमन केंद्रामध्ये दोनच फायरच्या गाड्या उभ्या राहण्यासाठी जागा होती. मात्र, आता नवीन इमारतीमध्ये सहा फायरच्या गाड्या उभ्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.
..................
अग्निशमन केंद्राच्या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ तीन हजार ७५९ चौ.मी. इतके आहे. १५ कोटी रुपये खर्च करून अग्निशमन दलाची इमारत उभी करण्यात आली आहे. लवकरच इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
-संजय देसाई, शहर अभियंता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.