मुंबई

मेट्रोमुळे विकासाचे नवे पर्व

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रो १२’ मार्गिकेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. ठाणे-भिवंडी-कल्याण आणि नवी मुंबई मेट्रो मार्गाच्या एकीकरणामुळे प्रवाशांना भविष्यात किफायतशीर दरात, कमी वेळेत आरामदायी तसेच सुलभ प्रवास करता येणार आहे.
एमएमआरडीएचा ३३७ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘मेट्रो १२’ प्रकल्पाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कल्याणपासून तळोज्यापर्यंत २०.७५ किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोलेगाव, निळजे गाव, वडवली, बाले, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. ही मेट्रो मार्गिका ‘ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेची विस्तारित मार्गिका आहे. या वेळी मेट्रोचे जाळे निर्माण करताना रस्ते, रेल्वे तसेच दळणवळणाच्या दृष्टीने चांगल्या सोयी-सुविधा नागरिकांना मिळतील, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
-------------------------------------
ठळक वैशिष्ट्ये
• मेट्रो मार्गाची एकूण लांबी : २२.१७३ किलोमीटर (उन्नत).
• एकूण स्थानके : १९ स्थानके (उन्नत).
• प्रकल्प पूर्णत्वाची किमत : ५,८६५ कोटी.
• दैनंदिन प्रवासीसंख्या : २.६२ लक्ष (२०३१-२०३२) २.९४ लक्ष (२०४१-२०४२)
• प्रकल्प पूर्णत्वाची वेळ ः ३० डिसेंबर २०२७
----------------------------------------
प्रकल्पाची सद्यस्थिती
स्थापत्य कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून नियुक्तीची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.
-----------------------------------
प्रकल्पाचे फायदे ः
- ठाणे-भिवंडी-कल्याण आणि नवी मुंबई मेट्रो मार्गासह मेट्रो मार्ग १२ च्या एकीकरणामुळे मुंबई-ठाणे- भिवंडी-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होणार आहे. यामुळे मोठ्या संख्येने लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच गुंतवणूक आकर्षित करून आणि मेट्रो स्थानकांभोवती व्यावसायिक आणि रिअल इस्टेट विकासाला चालना देऊन आर्थिक वाढीस चालना मिळू शकते.
- प्रस्तावित मेट्रो मार्गिकेमुळे वाहनांच्या संख्येत घट झाल्याने रस्तेबांधणी आणि देखभाल याचा खर्च कमी होईल. मुंबई मेट्रो मार्ग १२ सुरू केल्याने लोकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करून रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होईल.
- डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराएेवजी इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड मेट्रो गाड्यांकडे वळल्याने वायुप्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. ज्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला फायदा होईल. बस आणि रिक्षांच्या संख्येत घट होऊ शकते. तसेच रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होऊन वाहतूक व्यवस्थापन सुधारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT