Mumbai Metro sakal
मुंबई

Mumbai Metro: भूमिगत मेट्रो-३ च्या प्रवासात इंटरनेटचे नो टेन्शन!

Mumbai Metro: मेट्रो-३ साठी दूरसंचार पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. सौदी अरेबियातील रियाध शहरात हा करार पार पडला|Telecom infrastructure will be available for Metro-3. The agreement was signed in Riyadh, Saudi Arabia

CD

Mumbai Metro: कुलाबा- वांद्रे- सीप्झ मुंबई मेट्रो-३ या भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना प्रवाशांना मोबाईलची रेंज आणि इंटरनेट सेवेत अडथळा येऊ नये, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) सौदी अरेबियाच्या एसीईएस या कंपनीच्या इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीशी करार केला आहे. त्यामुळे मेट्रो-३ साठी दूरसंचार पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. सौदी अरेबियातील रियाध शहरात हा करार पार पडला.

कुलाबा-सिप्झ ही सुमारे ३३ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका भूमिगत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना मोबाईल रेंज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी मिळणार असा प्रश्न होता.

त्या पार्श्वभूमीवर एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, संचालक आर. रमणा आणि सौदीच्या संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय विभागातील दूरसंचार आणि पायाभूत सुविधांचे उपमंत्री बस्सम ए. अल-बस्सम, एसीईएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अक्रम अबुरस यांच्या उपस्थित करार करण्यात आला.

मेट्रो-३ मार्गावर दरवर्षी ६२५ दशलक्षाहून अधिक प्रवाशांना २७ स्थानके, मेट्रो ट्रेन आणि फलाटावर या करारामुळे पुढील बारा वर्षे ४-जी आणि ५-जी कनेक्टिव्हिटी सहजपणे मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT