मुंबई

चौकातील सौंदर्यीकरणाला अवकळा

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : शहर सौंदर्यात चार चांद लावणारे वेगवेगळ्या आकाराचे रंगीत कारंजे गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी गढूळ झाले आहे. शहरातील धूळ कमी करण्यासाठी या कारंजांचा वापर करण्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत होते; मात्र आता काही दिवसांपासून हे कारंजे बंद असल्याने धूलिकणांचाही त्रास वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.
नवी मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक चौक आणि मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांचे सशोभीकरण करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत शहर सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेने अनेक ठिकाणी शिल्प आणि कारंजे बसवले आहेत. अगदी बेलापूरपासून ऐरोलीपर्यंतचे महत्त्वाचे रस्ते, सेवा रस्ते, चौकांमध्ये वेगवेगळ्या आकारांत कारंजे बसवण्यात आले आहेत. महापालिकेने बसवलेल्या कारंजांपैकी बहुतांश कारंजे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. करावे गावाहून पाम बीचच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आलेले कारंजे, नेरूळ एनएमएमटी बस डेपोजवळील कारंजे पाण्याविना बंद पडले आहेत. नेरूळ, जुईनगर, बेलापूर, सानपाडा, वाशी परिसरात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या कारंजांची अवस्था खराब झाली आहे. रात्रीच्या वेळी कारंजांचे दिवे बंद असल्याने या भागात काळोख पसरलेला असतो.

-----------------
कारंजांची तांत्रिक कामे सुरू असल्यामुळे बंद करण्यात आले होते. आता कामे पूर्णत्वास आल्यानंतर कारंजे तात्काळ सुरू केले जातील.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT