tc railway news sakal
मुंबई

Railway News: फुकट्या प्रवाशांकडून १५७.१२ कोटींची दंड वसुली

विशेष तिकीट तपासणी पथकाने एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १५७.१२ कोटी एवढा दंड वसूल केला.

सकाळ वृत्तसेवा

Railway News: पश्चिम रेल्वेने एप्रिल ते फेबुवारी २०२४ या दहा महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून १५७.१२ कोटींची दंड वसुली केली आहे. यामध्ये मुंबई विभागातील ४२.१० कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एसी लोकलमधून ५६ हजारांहून अधिक प्रवासी विनातिकीट आढळले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले की, विशेष तिकीट तपासणी पथकाने एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १५७.१२ कोटी एवढा दंड वसूल केला.

एकट्या फेब्रुवारी महिन्यात बुक न केलेल्या सामानाच्या २.६३ लाख प्रकरणांसह १५ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. याच महिन्यात मुंबई उपनगरीय विभागात सुमारे १.०२ लाख प्रकरणे शोधून ४.५५ कोटी एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांना रोख लावण्यासाठी नियमितपणे तिकीट तपासणी केली जाते. एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ५६ हजारांहून अधिक प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांच्याकडून १.८८ कोटींहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जो सुमारे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ३५ टक्के जास्त असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VRSची विमानसेवा न वापरण्याचा शिवसेना शिंदे गटाचा निर्णय, शिंदेंच्या मंत्र्यांनीच दिली माहिती

Bribery Case Kolhapur : पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाखांची मागणी, तिघांनी लुटायचा प्लॅन आखला पण पोलिसांनी

Latest Marathi News Live Update : अमरावतीमध्ये कार दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू ५ गंभीर जखमी

Sindhudurg News: ऐतिहासिक निर्णय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ गावं इको सेन्सिटिव्ह, अंतिम अधिसूचना जारी..

Sakal Kolhapur : 'सकाळ' दिवाळी अंकास सलग दुसऱ्यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कार; मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे गौरव

SCROLL FOR NEXT