मुंबई

Mumbai Crime: मुंबईमध्ये पुन्हा गोळीबार; यावेळी कारण दारुचं

पोलिसांनी हॅरी ऊर्फ हरिसेन अॅन्थोनी जोसेफ याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मद्य पिण्यासाठी २०० रुपये दिले नसल्याच्या रागातून एकाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी क्रॉफर्ड मार्केटमध्ये घडली.

याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी हॅरी ऊर्फ हरिसेन अॅन्थोनी जोसेफ याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुसाफिरखाना परिसरात राहत असलेल्या राजू ऊर्फ अब्दुल्ला शेख यांचा क्रॉफर्ड मार्केटमधील बाबूराव शेट्टे चौक येथे बॅग विक्रीचा व्यवसाय आहे. अब्दुल्ला यांच्याकडे शुक्रवारी (ता. ८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ओळखीच्या असलेल्या बॅग विक्रीचे काम करणाऱ्या जोसेफ याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.

मात्र अब्दुल्ला यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, त्याच दिवशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अब्दुल्ला यांच्या घरी येत आरोपी जोसेफ व त्याच्या साथीदारांसोबत अब्दुल्लाच्या दिशेने गोळीबार करत तेथून पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

या गोळीबारात अब्दुल्ला हे गंभीर जखमी झाले असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT