Crime news  esakal
मुंबई

Mumbai Crime: पोपट आणि कासवांची मालेगावातून मुंबईत तस्करी; दोन ट्रक जप्त

सकाळ वृत्तसेवा


Thane Crime: पोपट आणि कासवांच्या तस्करीचा छडा लावण्यात वनविभागाला यश आले आहे. पडघा टोलनाका येथे शनिवारी (ता. ९) पहाटे उच्च प्रतीचे पाच कासव आणि ४५ पोपटांनी भरलेले दोन ट्रक जप्त केले आहेत.

याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून मालेगाववरून मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट येथे विक्री केली जाणार होती. वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.


घरात पोपट, कासव पाळण्याची हौस अनेकांना असते. यासाठी हजारांपासून लाखो रुपये मोजण्याची अनेकांची तयारी असते, पण कायद्याने पोपट किंवा कासवाची खरेदी-विक्री करणे गुन्हा आहे. असे असताना वन्यजीव तस्करीचे जाळे देशभर पसरले आहे.

मालेगाव येथून अशाचप्रकारे काही पक्षी मुंबईत विक्रीसाठी येत असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार वन अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने पडघा टोलनाका येथे सापळा रचला होता. यावेळी टोलनाक्याजवळ दोन ट्रक जप्त केले असून ट्रकचालक, क्लीनर तसेच अन्य तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

SCROLL FOR NEXT