मुंबई

कल्याण सिटी पार्कची नासधूस

CD

कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील सिटी पार्कचे लोकार्पण होऊन महिनाही उलटलेला नाही; मात्र सिटी पार्कमध्ये समाजकंटक उपद्रवींकडून नासधूस करण्यास सुरुवात झाली आहे. पार्कमधील झाडांना पाणी देण्यासाठी बसवलेली सिंचन यंत्रणा उपद्रवींनी उखडून टाकली आहे. तसेच गार्डनमधील पथवेच्या साईड लाईटचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून अशा उपद्रवींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण असावे, नैसर्गिक वातावरणाचा मनमुराद आनंद घेता यावा, या दृष्टिकोनातून सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून करोडो रुपये खर्च करून कल्याण पश्चिमेकडे सिटी पार्क सुरू करण्यात आले. आधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई आणि वेगवेगळ्या आकारातील झाडांची मांडणी, सायकल ट्रॅक, चालण्यासाठी मार्गिका याची पद्धतशीर मांडणी या उद्यानात करण्यात आल्याने नागरिकांची पहिल्या दिवसांपासून उद्यानाला पसंती मिळाली आहे. सुट्टीच्या दिवशी हजारो नागरिक या उद्यानात फिरण्यासाठी येत असल्याने मोठी गर्दी उसळते.

व्हिडीओ व्हायरल
सुट्टीच्या दिवशी तर जवळपास ७०० ते ८०० नागरिक तासभर तिकिटाच्या रांगेत उभे असतात. मागील रविवारी तर तिकीट मिळाले नाही, म्हणून लोकप्रतिनिधींना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर या नागरिकांना विनातिकीट उद्यानात प्रवेश देण्यात आला. झुंडीने नागरिक उद्यानात शिरल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. सिटी पार्कला असा नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे; मात्र काही उपद्रवींकडून उद्यानाची नासधूस करण्यात येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांची नाराजी
उद्यानातील सिंचनाचे पाईप उखडून तोडून टाकल्याचे फोटोही नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या उपद्रवींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनानेही या नुकसानीबद्दल खंत व्यक्त केली असून, नागरिकांनी हे उद्यान आपले आहे, असे समजून त्याचे जतन करावे, असे आवाहन केले आहे.

समाजमाध्यमांवर चर्चा
सिटी पार्कच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रियेसाठी रिकॉल करावे लागले आहे. सद्य:स्थितीत ज्या ठेकेदाराने सिटी पार्कचे काम केले आहे, त्यांच्या दोन-तीन सुरक्षारक्षकावर सिटी पार्कची मदार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया होईपर्यंत मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या दिमतीला असणारे जास्तीचे सुरक्षारक्षक काढून सिटी पार्क येथे तैनात केले, तर काय बिघडणार आहे, अशा चर्चा यानिमित्ताने रंगल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

Latest Marathi News Live Update : दादर येथील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा

'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video

IPL 2026: 'विराट-रोहितला जसा पर्याय नाही, तसाच संजू सॅमसनलाही...'; राजस्थान रॉयल्सच्या ट्रेडवर काय म्हणाला नवा कर्णधार?

SCROLL FOR NEXT