मुंबई

संत रोहिदास मार्गावर वाहतूक कोंडी

CD

संत रोहिदास मार्गावर वाहतूक कोंडी
मालवाहतुकीमुळे रहदारीला अडथळा
धारावी, ता. १० (बातमीदार) : धारावीतील संत रोहिदास मार्ग हा मुंबईतील एक महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्यावर त्याचा ताण मुंबईतील वाहतुकीवर होतो. दुकानदार व फेरीवाल्यांचा माल वाहतूक करणारे टेम्पो, ट्रक रस्त्यावरच उभे करून व्यापाऱ्यांना माल दिला जातो, त्‍यामुळे सतत वाहतूक कोंडी होते.
सकाळ-दुपार व संध्याकाळी रस्त्यावर हे वाहनचालक व माल विक्रेते भाजीपाला, फळे, किराणा माल घेऊन येतात व बिनदिक्कतपणे माल उतरवतात. त्यांना वाहतूक पोलिस व वाहतूक नियमांची कसलीच भीती वाटत नाही. त्‍यामुळे रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी पाहायला मिळते. एखाद्या पादचाऱ्याने अथवा दुसऱ्या वाहनचालकाने याबाबत विचारणा केल्यावर शिवीगाळ करणे, दादागिरी केली जाते.
अनेकदा वादावादीचे रूपांतर हाणामारीत होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने इथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT