मुंबई

गोवेलेमध्ये रस्‍त्‍याच्‍या डांबरीकरणाचे लोकार्पण

CD

गोवेलेमध्ये रस्‍त्‍याच्‍या डांबरीकरणाचे लोकार्पण
माणगाव, ता. १० (वार्ताहर) ः सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत गोवेलेमधील चिकणी वाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे लोकार्पण व आरोग्य शिबिराच्या वर्षपूर्तीचा उद्‍घाटन सोहळा शिवसेनेचे माणगाव तालुका संपर्कप्रमुख जयेश बाबूराव सावंत व माणगाव पंचायतीचे माजी सभापती सुजित शिंदे यांच्या हस्ते पार पडला. शिवसेनेच्‍या माध्यमातून गोवेले पंचक्रोशीतील विविध विकासकामे करण्यात आली असल्‍याचे माणगाव तालुकाप्रमुख जयेश सावंत यांनी सांगितले; तर माजी सभापती सुजित शिंदे यांनीही आपल्या भाषणात मोलाचे मार्गदर्शन केले. या वर्षीही शिबिराचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते. या वेळी चादोरे गावचे माजी सरपंच विष्णू भोसले, शाखाप्रमुख सुरेश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चाचले, तसेच साई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संदीप भालके, प्रणाली मोरे, मंचेकार, रणखांबे व परिसरातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT