मुंबई

नवी मुंबईत महाशिवरात्री उत्‍साहात

CD

थोडक्‍यात नवी मुंबई
नवी मुंबईत महाशिवरात्री उत्‍साहात
वाशी (बातमीदार) : महाशिवरात्रीनिमित्त नवी मुंबईतील महादेवाच्या मंदिरामध्ये शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी जमली होती. यावेळी महादेवाच्या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये पहाटे शिवलिंगावर पंचामृतांनी अभिषेक त्यानंतर सर्व भक्तांनी बेल, पांढऱ्या रंगाची फुले वाहून शिवलिगांची पूजा केली. तर भजन आणि कीर्तनाने नवी मुंबई दुमदुमून गेली. आनंद नगर येथील शंकर मंदिर, वाशी येथील पुरातन जागृतेश्वर मंदिर, सानपाडामधील शिवमंदिर, पाचबीच येथील बुद्धेश्वर मंदिर, घणसोली गावातील शिवमंदिर, महावितरण वसाहतीमधील शिवमंदिर, दिघा येथील शिव मंदिर आदी महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी जमली होती. आनंद नगर येथे हरिनाम सप्ताहाचा जागर करण्यात आला होता. महाशिवरात्री उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता.
.....................
ऐरोलीत महिलांचा सन्मान
वाशी (बातमीदार) : शिवसेना ऐरोली विधानसभेच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ऐरोली सेक्टर १९ येथील सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन मैदानामध्ये महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, कला व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका क्रांती प्रसाद, घणसोली येथील शेतकरी शाळेच्या माजी शिक्षिका अंजली पाटील यांच्या हस्ते सन्‍मानित करण्यात आले. यावेळी रबाळे पोलिस ठाण्याच्या स्मिता पवार, ॲड. स्वाती फडतरे आदी मान्यवर उपस्थित होत्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी महिलांनी आपले ध्येय ठरवावे व त्यादृष्टीने वाटचाल करावी, असे आवाहन केले. तर ज्या मुलांना पित्याचे छत्र नसते. अशा मुलांना प्रोत्साहन देऊन मदतीचा हात देत असल्याचेदेखील चौगुले म्हणाले. यावेळी राधिकाबाई मेघेच्या माजी मुख्याध्यापिका क्रांती प्रसाद म्हणाल्या की, महिलांसाठी चूल आणि मूल एवढेच होते; पण आता परिवर्तन झाले असून कॉम्प्युटरचा जमाना आला असून त्या दिशेने महिलांनीदेखील पाऊल टाकणे गरजेचे आहे. दिवसातून एक तास तरी त्यासाठी महिलांनी वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT