मुंबई

घोडबंदर येथे जलवाहिनीला गळती

CD

ठाणे शहर, ता. १० (बातमीदार) : पाण्याची चोरी होणे, जलवाहिनी फुटून पाणी वाया जाणे, हा ठाणे महापालिकेकरिता नवा प्रकार नाही. तसे प्रकार रोजच कुठे ना कुठे घडतात. घोडबंदर रोड, कापूरबावडी नाका परिसरातील रविवारी (ता. १०) असाच प्रकार घडला. मेट्रोच्या कामासाठी केलेल्या खोदकामात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले.
आधीच ठाण्यावर पाणीटंचाईचे संकट आहे, त्याच असा प्रकार घडल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोड, कापूरबावडी परिसरातील पेट्रोलपंपाजवळ भिवंडीकडे जाण्यासाठी मेट्रोच्या पिलरचे काम सुरू आहे. या ठिकाणी भूमिगत नाला रुंदीकरणाचे काम केले जात आहे. त्यासाठी जेसीबीच्या मदतीने खोदकाम केले आहे; मात्र हे काम करताना जमिनीत असलेल्या दोन जलवाहिन्या फुटल्या. त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. कामगार रात्रीच काम करून गेल्याने रात्रभर आणि रविवारी दिवसभर हे पाणी वाया जात होते. त्याची दुरुस्ती वेळेत न झाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. यंदा पावसाने दगा दिल्याने शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याने तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ठाण्यावर पाणी कपातीचे संकट आहे. अशाप्रसंगी हजारो लिटर पाणी वाया जाणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे हे संतापजनक असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष
पाण्याची चोरी होणे, जलवाहिनीला गळती लागणे, याकडे पाणीपुरवठा विभागाचे नेहमीच दुर्लक्ष करते. जमिनीत कुठे कुठे जलवाहिनी टाकल्या आहेत, त्यांच्याकडे याची नोंद नसेल किंवा तसे नकाशे नसतील तर पाणीपुरवठा नियोजन फसवे आहे, असेच म्हणावे लागेल. अशी कामे करताना पाणीपुरवठा विभागाने जमिनीत टाकलेल्या जलवाहिन्यांची माहिती ठेकेदारांना देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्याकडून अशा प्रकारांवर नियंत्रण येऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ११ लाख नाही फक्त एक लाख दुबार मतदार, मुंबईत मतदारांची छाननी; पालिकेचे तंत्रज्ञानाधारित मॉडेल यशस्वी

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गट–मनसे युतीचा जागावाटप फॉर्म्युला अंतिम

Nandgaon News : मिरची तोडल्याच्या आरोपावरून नांदगावच्या मजुरांवर जीवघेणा हल्ला; महिलांवर अत्याचाराचाही प्रयत्न

Ashes : इंग्लंडने अखेर लाज वाचवली, चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी जिंकली; ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव अन् WTC Point Table बदलले

Gajkesari Yog Lucky Rashi 2026: नवीन वर्षात ‘या’ राशींचे नशीब पलटणार, 'गजकेसरी राजयोग' देणार मोठं यश

SCROLL FOR NEXT