मुंबई

पोलिसांच्या वाहनातून पळालेल्या आरोपींना सुरतमध्ये अटक

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोघा आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले. मोईन यामीन कुरेशी आणि शाहीद अली शहा अशी आरोपींची नावे असून दोघेही गोवंडी परिसरातील राहणारे आहेत.


सुरत पोलिसांच्या मदतीमुळे या दोन्ही आरोपींना अटक करणे शक्य झाले. महिनाभरापूर्वी या दोघांवर नवघर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपी ऑर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होते. ५ मार्चला या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका होणार होती. याची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी दोघांना ऑर्थर रोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना पोलिस वाहनातून मुलुंड येथे आणण्यात येत होते. पोलिसांची गाडी घाटकोपरच्या छेडा नगर सिग्नलवर येताच दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गाडीतून पळ काढला. याबाबत त्यांच्यावर टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रणावरून दोन्ही आरोपी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून एका ट्रेनमधून सुरतला जात असल्याचे आढळले. नवघर पोलिसांनी ही माहिती सुरत पोलिसांना दिली. पोलिसांनी सुरत रेल्वेस्थानकावरून या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

IND vs ENG : अक्षर पटेल इतिहासाच्या उंबरठ्यावर! आज 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरणार?

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Latest Marathi Live Update: पुण्यात वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT