Thane News: सर्वोच्च न्यायालयात इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमच्या विरोधात तीन याचिका दाखल आहेत. या ईव्हीएमविरोधात कल्याणमध्ये मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. (kalyan rallay against evm)
हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून निघून शिवाजी चौक, सहजानंद चौक, बेतुरकर पाडा, खडकपाडा येथून प्रांत कार्यालयापर्यंत असेल. त्यानंतर प्रांत अधिकाऱ्याला निवेदन देवून मोर्चाचा समारोप होणार आहे.
या मोर्चामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील, सर्वोच्च न्यायालयाचे ॲड. भानुप्रसाद, ॲड. मेहमूद प्राचा, दिल्लीचे माजीमंत्री राजेंद्र पाल गौतम, केंद्रीय समन्वयक ईव्हीम हटावो संयुक्त मोर्चाचे कपिल डी. सी., राजेंद्र सिंहा, प्रकाश पोहरे, राजकुमार थोरात, लोक या ईव्हीमविरोधी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. भाजप सोडून सर्वच विरोधी पक्षाचे लोक यात सामील होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमविरोधात तीन याचिकांची सुनावणी सुरू आहे. त्याविरोधात दिल्लीत मोठे आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलकांनी प्रत्येक गावातून या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जर उमेदवारांची संख्या ५० पेक्षा जास्त झाल्यास बेलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील.
याबाबत उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी यांनी, तर निवडणूक आयोगाला जास्त उमेदवार झाल्यास मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल, असे पत्र लिहून कळविले आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. हे सर्व बघता निवडणूक आयोग व सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.