मुंबई

अवाडा एनर्जीची ५० अब्ज रुपयांची गुंतवणूक

CD

मुंबई, ता. १० : अवाडा एनर्जीतर्फे राज्यातील दहा जिल्ह्यांतल्या १९२ ठिकाणी ५० अब्ज रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. कृषी सौर पी. व्ही. प्रकल्पांचे विकेंद्रीकरण करून त्यांचा विकास आणि कार्यसंचालन करणे हा याचा हेतू आहे. अवाडा ग्रुपच्या अवाडा एनर्जी या विभागाला महाराष्ट्र शासनाच्या एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड या उपकंपनीने लेटर ऑफ अवॉर्ड दिले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

लेटर ऑफ अवॉर्ड देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण समृद्धी आणि शाश्‍वत ऊर्जा यांचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी अवाडा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल उपस्थित होते. लेटर ऑफ अवॉर्ड दिल्यामुळे अवाडा एनर्जीला कामे करता येतील. कृषी सौर पीव्ही प्रकल्पांमुळे राज्यात १,१३८ मेगावॉट ऊर्जा उपलब्ध होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन किंवा मिशन २०२५ चा हा प्रकल्प एक भाग आहे. सन २०२५ पर्यंत तीस टक्के कृषी फीडरचे सौरऊर्जेत रूपांतर करण्याचे उद्दिष्ट यावेळी स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्रातील सुमारे तीन कोटी ग्राहकांपैकी ४५ लाख ग्राहक २२ टक्के वीज वापर करणाऱ्या कृषी क्षेत्रातील आहेत. अवाडा एनर्जीच्या या प्रकल्पामुळे सुमारे अडीच हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena: शिवसेनेत मोठे बदल होणार! 'काम करा नाहीतर पद सोडा...'; पदाधिकाऱ्यांना कडक इशारा, पडद्यामागे काय घडतंय?

Mumbai News: मुंबईकरांसाठी गूडन्यूज! १२ डब्यांच्या २३८ नव्या लोकल खरेदी करणार; १९ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Gokul dairy election news : गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर, १२०० दूध संस्थांच्या निर्णयानंतरच निवडणुका; कोर्टाने दिले थेट आदेश

लक्ष्मीकांत बेर्डेंचं गाजलेलं नाटक 'शांतेचं कार्टं चालू आहे' पुन्हा रंगभूमीवर ! प्रियदर्शन-विशाखाची रंगणार जुगलबंदी

Agniveer MR Musician Recruitment 2026 : आता संगीतकार बनू शकतात अग्निवीर! भारतीय नौदलात भरती होण्याची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT