मुंबई

सुपारीला भौगोलिक मानांकन देणार ः कृषिमंत्री धनंजय मुंडे

CD

दिवेआगर, ता. १० (बातमीदार) : श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राला पर्याय म्हणून दिवेआगर येथे दोन हेक्टर क्षेत्रावर विस्तारित संशोधन केंद्र होत आहे. या केंद्राचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज दिवेआगर येथे करण्यात आले. यावेळी श्रीवर्धनच्या सुपारीला तसेच रोहाच्या वाल यांना भौगोलिक मानांकन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन दिवेआगर येथील जमीन व हवामानामध्ये सुपारीची प्रतसुद्धा चांगली असते; पण श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून एकूण क्षेत्र हे अत्यंत अल्प आहे. त्यामुळे पुढील संशोधनासाठी सुपारी संशोधन केंद्रास क्षेत्राची आवश्यकता होती. याच अनुषंगाने दिवेआगर येथे पाच एकर क्षेत्र शासनामार्फत विद्यापीठाला हस्तांतरित करण्यात आले होते. त्यापैकी दोन हेक्टर जमिनीवरील विस्तारित सुपारी संशोधन केंद्राचे भूमिपूजन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी (ता. १०) करण्यात आले. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सुपारी फळाला आपल्या जीवनात आगळेवेगळे महत्त्व आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच सिडकोकडून मिळणाऱ्या ५०० कोटींच्या निधीतून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिवेआगर येथे होत असलेले सुपारी संशोधन केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, असे आमचे स्वप्न आहे. तर महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सुपारी संशोधन केंद्रामुळे पर्यटन वाढीसाठी फायदा होईल, असे मत मांडले.
-------------------------------------------------------
केंद्रात ‘या’ बाबींवर संशोधन
दिवेआगार येथील संशोधन केंद्रात सुपारीच्या विविध जातीच्या चाचण्या व पीक सुधार नवीन जाती विकसित करण्यात येणार आहेत. याचबरोबर सुपारीचे एकात्मिक व्यवस्थापन तंत्र, आधारित पीक पद्धती, पिकाचे काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्यवर्धन करणे, तसेच विविध फळे, भाजीपाला, मसाला पिके या पिकांवर संशोधन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT