Crime News Sakal
मुंबई

Crime News: सिडकोच्या घरासाठी वृद्धाची सोळा लाखांना फसवणूक

Mumbai Crime: सुर्वे याने त्यांना घर दाखवले. त्यासाठी सुर्वेच्या एस. एंटरप्राईजेस कंपनीच्या बँक खात्यात २७ लाख २५ हजार रुपये हस्तांतर केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: सिडकोच्या घरासाठी घेतलेल्या सुमारे सोळा लाखांचा अपहार करून फसवणूक झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महेश गोपाळ सुर्वे या एजंटविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.


६५ वर्षांचे तक्रारदार हे नवी मुंबईतील जुईनगरचे रहिवासी असून ते नायर रुग्णालयातून निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्तीतून मिळालेल्या पैशांतून घरखरेदी करायची होती. सुर्वे याने त्यांना घर दाखवले. त्यासाठी सुर्वेच्या एस. एंटरप्राईजेस कंपनीच्या बँक खात्यात २७ लाख २५ हजार रुपये हस्तांतर केले होते.

मात्र, घराची कागदपत्रे देण्यास तो टाळाटाळ करत होता आणि पैसेही देत नव्‍हता. दरम्यानच्या काळात त्याने साडेअकरा लाख परत केले, मात्र सोळा लाखांचा दिलेला धनादेशही वटला नाही. त्यामुळे तक्रारदाराने त्याच्याविरोधात गोरेगाव पोलिसांत धाव घेतली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश सुर्वे याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीस आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर; आधी शहांना भेटले, आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट

Live-in Partner vs Dowry Law: पत्नी नाही, तरी गुन्हा? लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा कायद्याचा हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल

मला काहीही झालं तरी तू... हार्दिक जोशीने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- 'अक्षयाने १२- १३ मालिका सोडल्या...'

Horoscope: यंदा ३०० वर्षांनंतर १२ दुर्मिळ योग आणि ४ राजयोगांचा महासंयोग; महाशिवरात्रीला या राशींचं नशीब उजळणार!

PMC Standing Committee : स्थायी समितीचे सदस्य निवडताना भाजपकडून धक्कातंत्राचा वापर; १६ पैकी १३ नगरसेवक उपनगरांमधील

SCROLL FOR NEXT